एक्स्प्लोर
Success Story: वडील शेतकरी, आई गृहिणी... जळगावच्या 'कलाकार' पोरीची कमाल! चित्रांना परदेशातही मागणी, दिग्गजांकडून कौतुक
कादंबरीच्या चित्रांची दिग्गजांनी दखल घेतली आहे. सध्या मुंबईतील ओबेरॉय हॉटेलमध्ये तिच्या पेंटिंगचं प्रदर्शन लागलं आहे.जळगावमधील एका खेड्यातून आलेली मुलगी आपल्या कलेच्या माध्यमातून चर्चेत आली आहे.

Jalgaon News Kadambari Chaudhari panting exhibition
1/11

जळगावमधील एका खेड्यातून आलेली मुलगी मुंबईत आपल्या कलेच्या माध्यमातून चर्चेत आली आहे. कादंबरी चौधरी असं या 24 वर्षीय तरुणीचं नाव आहे.
2/11

कादंबरीच्या चित्रांची दिग्गजांनी दखल घेतली आहे. सध्या मुंबईतील ओबेरॉय हॉटेलमध्ये तिच्या पेंटिंगचं प्रदर्शन लागलं आहे.
3/11

या प्रदर्शनाला आतापर्यंत अनेक दिग्गजांनी भेटी दिल्या आहेत. तसेच परदेशी पर्यटकांनी देखील या प्रदर्शनाला भेट दिली असून तिच्या चित्रांना मोठी मागणी देखील होत आहे.
4/11

जळगावच्या पिलखेडा गावची कादंबरी. वडील शेतकरी तर आई गृहिणी. सात वर्षांची असल्यापासून तिनं ब्रश हाती पकडला.
5/11

आईवडिलांनीही तिला साथ दिली अन् आज लेकीचं कौतुक ते देखील पाहत आहेत.
6/11

7 वर्षे वयाची असताना सहज म्हणून हातात ब्रश पकडला आणि आज कादंबरीची चित्र देशविदेशात पोहोचली आहेत.
7/11

जे जे कॉलेज ऑफ आर्ट्समधून चित्रकलेचे शिक्षण संपादन केल्यानंतर तिचं पहिलंच प्रदर्शन मुंबईत लागलं आहे.
8/11

विशेष म्हणजे तिने रेखाटलेल्या चित्रांना परदेशातही मागणी असून आतापर्यंत हॉंग-कॉंग, दुबई,पॅरिस येथे तिने चित्रे पाठवली आहेत..
9/11

तिच्या प्रत्येक चित्रात एक विशिष्ट भाव अणि गूढता दिसून येते. प्रत्येक कलारसिकाच्या चित्ताला स्पर्श करतील अशा कलाकृती अणि नाविन्यपूर्ण चित्रं "चित्त स्पर्श" च्या माध्यमातून घेऊन आली आहे.
10/11

या प्रदर्शनाचं उद्घाटन 24 डिसेंबर रोजी आयपीएस कृष्णप्रकाश यांच्या हस्ते, दिग्दर्शक अक्षय इंडिकर यांच्या उपस्थितीत झालं.
11/11

या प्रदर्शनाला ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम, अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्यासह दिग्गजांनी भेट देऊन कादंबरीचं कौतुक केलं आहे. हे प्रदर्शन 4 जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे.
Published at : 29 Dec 2022 05:29 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
बातम्या
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
