राज्याच्या विविध भागात थंडीचा जोर वाढला आहे. पारा घसरल्यामुळं अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्या आहे. राज्यात साततत्यानं तापमानात बदल होत आहे.
2/10
राज्याच्या काही भागात थंडीची लाट (Cold Wave) आली आहे. थंडीचा जोर वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातही थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे.
3/10
सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये (Satpura Mountain Range) तापमानाचा (Temperature) पारा चांगलाच खाली आला आहे. तिथे तापमानाचा पारा 8.5 ते 9 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आहे.
4/10
तोरणमाळ परिसरात धुक्याची चादर पसरली आहे. थंडी वाढल्याचा परिणाम मानवी जनजीवनावर होत आहे.
5/10
नंदूरबार जिल्हा चांगलाच गारठला आहे. तापमानाचा पारा घसरल्यानं हुडहुडी वाढली आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत या परिसरात कडाक्याची थंडी राहत असल्यानं नागरिक थंडीपासून बचावासाठी शेकोटीचा आधार घेत असल्याचं चित्र ठिकठिकाणी पाहण्यास मिळत आहे.
6/10
सातपुड्याच्या डोंगर रांगामध्ये दाट धुके पाहण्यास मिळत असून तोरणमाळ येथील सातपायरी घाट, सिताखाई, यशवंत तलाव परिसरात दाट धुके पाहण्यास मिळत आहे.
7/10
हिंगोली जिल्ह्यातही तापमानाचा पारा घसरला असून हुडहुडी वाढली आहे.
8/10
उत्तर महाराष्ट्रातही तापमानाचा पारा घसरला आहे. नाशिक, धुळे जळगावमध्ये थंडीचा जोर वाढला आहे.
9/10
अनेक ठिकाणी दाट धुक्याची चादर पसरली आहे. त्यामुळं वाहन चालवताना अडचणी निर्माण होत आहेत.
10/10
राज्यात गारठा वाढला असतानाच देशातील अनेक भागात तापमानाचा (Temperature) पारा घसरला आहे. त्यामुळं हुडहुडी वाढली आहे. डोंगरापासून मैदानी प्रदेशापर्यंत कडाक्याची थंडी जाणवत आहे.