एक्स्प्लोर

शेवाळे, किर्तीकर, अडसुळांपासून अनेक इच्छुक; पण उमेदवारी न मागणाऱ्या वाघमारेंना राज्यसभेवर पाठवलं, एकनाथ शिंदेंनी नेमकं कारण सांगितलं!

शिवसेनेकडून ज्योती वाघमारे  (Jyoti Waghmare) यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Eknath Shinde :  राज्यातील राज्यसभेच्या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होती. आज निवडणुकीसाठी भाजपने आपले चार उमेदवार आधीच निश्चित केले होते. मात्र एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून (Shiv Sena) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) राज्यसभेचा उमेदवार कोण असणार, याबाबत शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता कायम होती. अखेरीस शिंदे यांच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारे  (Jyoti Waghmare) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, अनेकजण इच्छुक असताना ज्योती वाघमारे यांनाच उमेदवारी का दिली? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

ज्योती वाघमारेंनी राज्यसभेची उमेदवारी मागितली नव्हती, पण आम्ही लाडक्या बहिणीला संधी दिली 

शिवसेना सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम करत असल्याचे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. आम्ही लाडक्या बहिणीला संधी दिल्याचे शिंदे म्हणाले. शिवसेनेनं केलेली निवड सार्थक ठरेल. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी ही सर्वांची भावना होती असे एकनाथ सिंदे म्हणाले. शरद पवार यांची विनंती आणि सर्वांच्या म्हणण्यानुसार निवडणूक बिनविरोध झाल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. ज्योती वाघमारेंनी राज्यसभेची उमेदवारी मागितली नव्हती असेही एकनाथ शिंदे म्हणाले. 

मला वाटलं नव्हतं की, कधी हा दिवस येईल : ज्योती वाघमारे 

 मला वाटलं नव्हतं की, कधी हा दिवस येईल. कारण लहानपणापासून भाकरीचा संघर्ष बघितला. लहानपणापासून भुकेचे चटके सोसले. लहानपणापासून संघर्ष केला. त्यानंतर शिवसेना सेनेच्या दसरा मेळाव्यात बोलण्याची संधी मिळाली. तेव्हा वाटलेलं की यापेक्षा मोठा काहीही होऊ शकत नाही. परंतु शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जसं म्हणायचे की, शिवसैनिक हीच तुमची जात आणि तोच तुमचा धर्म. आज कुठल्याही पद्धतीचे आरक्षण नसताना माझ्यासारखी दलित समाजाची मुलगी देशाच्या वरिष्ठ सभागृहात पोहोचते आहे, त्याबद्दल एकनाथ शिंदे यांचे आभार, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.  

दिलेल्या संधीचं सोनं करेन : ज्योती वाघमारे

ज्योती वाघमारे यांना उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत विचारले असता ज्योती वाघमारे म्हणाल्या की, मी खूप साधी मुलगी आहे. मी खूप गरीब मुलगी आहे. मला राजकारण कळत नाही. पण मला विश्वास आहे की, माझे नेते एकनाथ शिंदे यांनी जी संधी मला दिली, त्या संधीचं सोनं मी करेन. ज्येष्ठ नेत्यांचे योगदान पक्षासाठी खूप महत्त्वाचे आहे. आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या निर्णयासोबत सगळे जण थांबतील आणि सगळ्यांना आनंद वाटेल की, कुठलाही वारसा नसलेली, कुठल्याही घराण्याची परंपरा नसलेली देशाच्या वरिष्ठ सभागृहात जाणार, असे त्यांनी यावेळी सांगितले. 

महत्वाच्या बातम्या:

Rajya Sabha Election 2026: लहानपणापासून भुकेचे चटके सोसले, संघर्ष केला, दलित समाजाची मुलगी देशाच्या वरिष्ठ सभागृहात जाणार, शिंदे साहेबांनी...; राज्यसभेची उमेदवारी मिळताच ज्योती वाघमारेंची पहिली प्रतिक्रिया

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 एप्रिल 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 एप्रिल 2026 | रविवार
एका बाजूला तापमानाचा पारा 44 अंशावर, तर दुसऱ्या बाजूला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, शेतकऱ्यांची चिंता वाढली
एका बाजूला तापमानाचा पारा 44 अंशावर, तर दुसऱ्या बाजूला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, शेतकऱ्यांची चिंता वाढली
गौतम अदानींची मोठी घोषणा, 'या' प्रकल्पात करणार 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 143 एकरमध्ये होणार काम
गौतम अदानींची मोठी घोषणा, 'या' प्रकल्पात करणार 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 143 एकरमध्ये होणार काम
Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली
Vishwas Nangare Patil : 5 मिनिटात प्रेरणादायी विचार नांगरे पाटलांचे कोकरूडमधील भाषण
Rohit Pawar Latur : VSR कंपनीच्या मालकांना सरकार एवढे का घाबरत आहे? रोहित पवार यांचा सवाल
PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Ajit Agarkar: अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
Ravichandran Ashwin: चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
Embed widget