एक्स्प्लोर
PHOTO : बलसागर सागर भारत होवो... लाल किल्ल्यावर डौलानं फडकला राष्ट्रध्वज, सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती
पंच्याहत्तर वर्षांपूर्वी देश स्वातंत्र्य झाला. आज संपूर्ण देशभरात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जात आहे.

india independence day 2022
1/9

पंच्याहत्तर वर्षांपूर्वी देश स्वातंत्र्य झाला. आज संपूर्ण देशभरात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जात आहे. या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाच्या विविध भागांत राष्ट्रध्वज फडकवण्यात आला.
2/9

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या विशेष प्रसंगी पंतप्रधान मोदींनी नवव्यांदा लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावला आणि देशाला संबोधित केलं. आज तब्बल 1 तास 22 मिनिटं 32 सेकंद मोदींनी भाषण केलं.
3/9

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळी ट्वीट करून सर्व देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
4/9

राष्ट्रध्वज फडकवल्यानंतर त्यांनी देशाला संबोधित केलं. लाल किल्ल्यावरील मोदींचं हे नववं भाषण आहे. आज भारताचा राष्ट्रध्वज जगाच्या कानाकोपऱ्यात अभिमानानं फडकतोय, आजचा दिवस ऐतिहासिक आहे, असं मोदी म्हणाले.
5/9

पंतप्रधान म्हणाले की, "नवीन संकल्प आणि नवीन धैर्यानं पावलं उचलण्याचा आजचा दिवस. गुलामगिरीचा संपूर्ण काळ स्वातंत्र्याच्या लढ्यात घालवला आहे. भारताचा असा एकही कोपरा नाही जिथे लोकांनी शेकडो वर्षे गुलामगिरीविरुद्ध लढा दिला नाही"
6/9

"2014 मध्ये देशातील जनतेनं माझ्यावर जबाबदारी सोपवली होती. स्वातंत्र्यानंतर जन्म घेतलेली मी पहिली व्यक्ती आहे. जिनं लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान म्हणून देशवासियांना संबोधित करण्याची संधी मिळाली.", असही ते म्हणाले.
7/9

लाल किल्ल्यावरुल ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी जगभरातील अनेक व्हीआयपी/व्हीव्हीआयपी, विशेष आमंत्रित लोग, एनसीसीचे कॅडेट आणि इतर लोक उपस्थित होते.
8/9

कार्यक्रमासाठी उपस्थित VVIP ताफ्यांसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्या वाहनांचे वेगवेगळे मार्ग निश्चित करण्याबरोबरच आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठीही प्रशासन सज्ज होतं.
9/9

पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात म्हटलं की, "मी या स्वातंत्र्यदिनी सर्व भारतीयांचे आणि भारतावर प्रेम करणाऱ्यांचे अभिनंदन करतो. नव्या निर्धारानं, नव्या दिशेनं वाटचाल करण्याचा आजचा दिवस आहे."
Published at : 15 Aug 2022 10:32 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
