Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
मंडळी सध्या लग्नाचा सीझन आहे... पण आम्ही आज तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणच्या काही लग्नांच्या अशा काही कहाण्या सांगणार आहोत, की ज्या कहाण्या पाहून तुम्हीही हैराण व्हाल. पाहूयात अशाच काही लग्नांच्या गजब कहाण्या...
बिहारच्या गयामधील या लग्नात
सगळं घडलं ते रसगुल्ल्यांवरुन...
होय... लग्न मोडण्याचं कारण ठरला रसगुल्ला...
लग्नानंतर जेवणाच्या पंगती बसल्या...
मात्र पंगतीत रसगुल्ले कमी पडले
आणि काही वऱ्हाडी मंडळींचं डोकंच सणकलं...
त्यात वर आणि वधूकडचे आमनेसामने आले...
आणि तुफान हाणामारी रंगली...
प्रकरण चिघळलं आणि वधूपक्षानं थेट लग्नासाठी नकारच देऊन टाकला....
आता हे दुसरं लग्न पाहा...
यातली नवरी कोण आणि नवरा कोण?
तुम्हीच ओळखा पाहू...
आंध्र प्रदेशातल्या प्रकाशम जिल्ह्यातलं
हे अनोखं लग्न आज देशभरात प्रचंड मोठा चर्चेचा विषय ठरलंय...
एका पारंपरिक प्रथेनुसार लग्नामध्ये
नवरदेवाला वधूचा पेहराव...
तर नवरीला नवरदेवाचा पेहराव करावा लागतो...
या वेशातच वधू-वरांना सगळे विधी पार पाडावे लागतात...
आणि लग्नाची वरातही याच अवतारात निघते...
All Shows


































