IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
IndiGo Flight Crisis: पुण्यात लँड होण्याची परवानगी मिळत नाही, त्या ठिकाणी लँड होण्यासाठी जागा नाही, असं कारण सांगून इंडिगो क्रू आणि व्यवस्थापनाने फ्लाईट पुण्याऐवजी हैदराबादला लँड केली.

नागपूर: नागपूरातील प्रवाशांना इंडिगोच्या विमानाने (IndiGo Flight Crisis) पुण्याला जायचे होते. मात्र इंडिगोने काल (गुरूवारी, ता ४) प्रवाशांना मध्यरात्री नागपुरातून घेऊन पुण्याऐवजी हैदराबादला सोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काल रात्री 11 वाजून 40 मिनिटांना नागपूर - पुणे अशी इंडिगोची फ्लाईट (IndiGo Flight Crisis) नियोजित होती. मात्र ती फ्लाईट एक वाजेपर्यंत नागपुरातून उडालीच नव्हती. एक वाजता नंतर फ्लाईटने उड्डाण घेतले. मात्र अर्ध्या तासाच्या उड्डाणानंतर (IndiGo Flight Crisis) आपल्या विमानाला पुण्यात लँड होण्याची परवानगी मिळत नाही, त्या ठिकाणी लँड होण्यासाठी जागा नाही, असं कारण सांगून इंडिगो क्रू आणि व्यवस्थापनाने फ्लाईट पुण्याऐवजी हैदराबादला लँड केली.(IndiGo Flight Crisis)
हैदराबादला लँड झाल्यानंतरही प्रवाशांना सुमारे एक तास विमानाच्या बाहेर येऊ दिले नाही.अखेरीस काही प्रवाशांनी विमानाचे आत गोंधळ घातले, त्यानंतर त्यांना हैदराबाद टर्मिनलवर (IndiGo Flight Crisis) बाहेर निघू दिले. अजूनही नागपूरचे बरेचशे प्रवासी पुण्याला जाण्यासाठी हैदराबादला अडकून आहेत. नागपूरातील प्रवाशांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हैदराबाद विमानतळावर सध्या वाराणसीवरून पुण्याला जाण्यासाठी निघालेल्या विमानाचे प्रवासीही पुण्याला न पोहोचता हैदराबादला अडकून पडले आहे. हैदराबाद विमानतळावर प्रवाशांचे प्रचंड हाल होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
IndiGo Flight Crisis: पुणे विमानतळावर प्रवासी संतापले
पुणे विमानतळावरतीही प्रवासी मोठ्या प्रमाणावर संतापले आहेत, ना कोणती माहिती दिली जात आहे, ना फ्लाईट कॅन्सल करता येत आहे, वडिलांचं निधन झालंय तिथही पोहोचता येत नाहीये पुण्यातील विमानतळावर इंडोगोची विमानसेवा खोळंबली आणि त्याचा मनस्ताप अनेक प्रवाशांना सहन करावा लागत आहे. कोणाला लग्नाला जायचंय, कोणाला फिरायला जायचंय ,एका प्रवाशांच्या वडिलांचं निधन झालंय तर एका प्रवाशाला स्वतःच्याच मुलाच्या सखापुड्याला पोहचणं कठीण झाल आहे. इंडिगो कंपनी कडून प्रवाशांसोबत कोणताही संपर्क साधला जात नाही आहे आणि सोबतच त्यांना ठोस माहिती दिली जात नाही आहे. अनेक प्रवासी साधारण रात्री १० पासून पुणे विमानतळावर विमानांची वाट बघत थांबलं आहेत. त्यांना विमानांच्या वेगवेगळ्या वेळा सांगण्यात येत आहेत त्यामुळे प्रवासी संताप व्यक्त करताना दिसत आहे.
इंडिगोमुळे पुणे विमानतळावर मोठी अडचण झाल्याचं चित्र दिसून येत आहे. इंडिगोमुळे इतर विमान कंपन्यांची अडचण निर्माण झाली आहे. इतर कंपन्यांच्या विमानांना जागाच नव्हती. विमानतळावर इंडिगोची 9 विमानं उभी होती, मागील दोन दिवसात एकूण ३८ विमान उड्डाण रद्द झाली, आता देखील काही विमान एयरपोर्टवर उभी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
IndiGo Flight Crisis: पुणे विमानतळावर विमान सेवा कोलमडली
पुणे विमानतळावर विमान सेवा कोलमडली आहे. पुणे विमानतळावर विमाने उतरवण्यास अडथळा येत आहे. त्यामुळे येणारी विमान उतरवण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. रन वे वर अनेक विमान थांबून आहेत.
IndiGo Flight Crisis: रन वेवर अनेक विमान थांबून; इंडिगो कंपनीची विमान सेवा रद्द
पुणे विमानतळावर विमान सेवा कोलमडली आहे. पुणे विमानतळावर विमाने उतरवण्यास अडथळा त्यामुळे येणारी विमान उतरवण्यास अडचणी येत आहेत. रन वेवर अनेक विमान थांबून आहेत. पुण्यात गेले दोन दिवसात ३८ विमाने रद्द झाले आहेत. इंडिगो कंपनीची विमान सेवा रद्द करण्यात आली आहे. अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. दिल्लीहून पुण्याकडे विमाने पण उशीर येत आहेत. दिल्ली विमानतळावर विमाने अडकून पडली होती. मनुष्यबळाचा अभाव असल्याने विमान सेवा कोलमडली असल्याची माहिती आहे. गेले चार-पाच दिवसापासून प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
























