Bollywood Actor Struggle Life: ना हीरो ना विलन, इंडस्ट्रीचा असा दिग्गज ज्यानं 70 वर्षांच्या करिअरमध्ये धर्मेंद्र-बिग बींनाही पाजलं पाणी; आज मुलंही सुपरस्टार
Bollywood Actor Struggle Life: दिग्गज अभिनेत्यानं एक, दोन नाहीतर तब्बल 400 हून अधिक सिनेमे केले. या सिनेमांमध्ये त्यांनी अनेक उल्लेखनिय भूमिका साकारल्या.

Bollywood Actor Struggle Life: बॉलिवूडमध्ये (Bollywood News) नशीब आजमावण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. त्यापैकी काहीजण यशस्वी होतात, तर काहींचं स्वप्न स्वप्नच राहातं. काहींच्या नशीबी अपयशही येतं, पण त्यावर मात करुन ते यशाचं सर्वोच्च शिखर गाठतातच. आज आम्ही तुम्हाला अशाच एका कलाकाराबाबत सांगणार आहोत, ज्यानं कित्येक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. फक्त मनोरंजनच नाही केलं, तर या अभिनेत्यानं प्रेक्षकांना खळखळून हसवलं. या दिग्गज अभिनेत्यानं एक, दोन नाहीतर तब्बल 400 हून अधिक सिनेमे केले. या सिनेमांमध्ये त्यांनी अनेक उल्लेखनिय भूमिका साकारल्या. आम्ही ज्या अभिनेत्याबाबत बोलतोय तो दिग्गज म्हणजे, जगदीप (Jagdeep). त्यांचं नाव सय्यद इश्तियाक अहमद जाफरी, जे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध कॉमेडियन (Famous Comedian) आहेत. चित्रपटांमधील त्यांच्या कॉमिक टायमिंगनं सर्वांना मोहीत केलंय.
'शोले'मुळे मिळाली खरी ओळख
15 ऑगस्ट 1975 रोजी प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या 'शोले' (Sholey Movie) या कल्ट सिनेमाबाबत (Cult Movie) कुणाला माहीत नाही, असं कुणीच नाही. आजही हा सिनेमा चाहत्यांच्या मनावर राज्य करतोय. या सिनेमातली जगदीप यांची 'सुरमा भोपाली' ही व्यक्तिरेखा खूप प्रसिद्ध झाली. हे पात्र लोकांच्या मनात कोरलं गेलंय. "हमारा नाम सूरमा भोपाली ऐसे ही नहीं है...", जगदीप यांचा हा डायलॉग खूप गाजला. त्यांनी 1951 मध्ये बी. आर. चोप्रा यांच्या 'अफसाना' या चित्रपटातून बाल कलाकार म्हणून आपल्या सिनेक्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली, त्यानंतर त्यांनी त्यांच्या काही उत्कृष्ट भूमिका साकारल्या.
70 वर्षांपेक्षा जास्त काळ सिनेसृष्टीत केलंय काम
फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांनी तब्बल 70 वर्षांहून अधिक काळ काम केलंय. आपल्या करियर दरम्यान त्यांनी फिल्म शोले व्यतिरिक्त 'ब्रह्मचारी', 'दो बीघा जमीन', 'पुराना मंदिर', 'अंदाज अपना अपना'सह कित्येक सुपरहिट फिल्म्स दिल्यात. 1994 मध्ये आलेली फिल्म 'अंदाज अपना अपना'मध्ये सैयद इश्तियाक अहमद जाफरी यांनी सलमान खानच्या वडिलांची भूमिका साकारलेली.
जगदीप यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत थोडसं...
जगदीप यांचा जन्म 29 मार्च रोजी मध्य प्रदेशातील दातियामध्ये झालेली. 1947 मध्ये फाळणी झाल्यानंतर ते आपल्या कुटुंबासह मुंबईत आले. जगदीप लहान असताना त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती फारच बेताची होती. अशातच त्यांनी घर खर्च चालवण्यासाठी रस्त्यांवर साबण, कंगवा यांसारख्या लहान-सहान वस्तू विकायला सुरुवात केलेली. दरम्यान, त्यांची तीन लग्न झालेली, त्यांना 6 मुलं आहेत. जावेद जाफरी आणि नावेद जाफरी त्यांच्या दुसऱ्या पत्नीची मुलं आहेत. जगदीप यांनी 8 जुलै 2020 मध्ये मुंबईत अखेरचा श्वास घेतला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























