धुळे जिल्ह्यात पोलिस वाहनाचा भीषण अपघात झाला असून या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
2/6
शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर दहिवद गावाजवळ महामार्ग वाहतूक शाखा शिरपूर यांचे बोलेरो वाहन क्रमांक MH18 BX 0232 चे मागील टायर फुटल्याने वाहन पलटी झाले.
3/6
वाहन पटली होऊन झालेल्या या अपघातात 1)नवल वसावे 2)प्रकाश जाधव 3)अनिल पारधी असे तीन पोलीस अंमलदार जखमी झाले होते. त्यानंतर, तात्काळ त्यांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
4/6
अपघातातील गंभीर जखमी नवल वसावे यांच्यावर शिरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनं शिरपूर पोलीस वर्तुळात शोककळा पसरली आहे.
5/6
पोलिस गाड्या ह्या सुरक्षित आणि उत्तम असायला हव्यात, पण पोलिसांच्या कारचे टायर फुटून अपघात होत असले तरी ही गंभीर बाब असल्याची चर्चा तालुक्यात होत आहे.
6/6
दरम्यान, अपघाताच्या घटनेचा तपास केला जात असून इतर जखमी दोन पोलीस कर्मचाऱ्यांवरही रुग्णालयात उपचार सूरू आहेत.