एक्स्प्लोर

Crime News: नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!

Crime News: उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडलेल्या सौरभ हत्याकांडात मुख्य आरोपी ठरलेल्या मुस्कानने आता आपल्या नवजात मुलीचा चेहरा प्रियकर साहिलला दाखवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Crime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठमध्ये घडलेल्या सौरभ हत्याकांडात (Meerut Blue Drum Case) मुख्य आरोपी ठरलेल्या मुस्कानने आता आपल्या नवजात मुलीचा चेहरा प्रियकर साहिलला दाखवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी तिने कारागृह प्रशासनाकडे विशेष परवानगीची विनंती केली होती; मात्र तुरुंग नियमांनुसार अशा प्रकारची प्रत्यक्ष भेट घेण्याची तरतूद नसल्याने प्रशासनाने तिचा प्रस्ताव फेटाळून लावला.

सौरभची पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल या दोघांनी इंदिरानगर परिसरात 3 मार्च 2025 च्या रात्री सौरभची क्रूरपणे हत्या केली होती. सौरभला झोपेची गोळी देण्यात आली. त्यानंतर छातीत वार करून त्याला ठार केले. मृतदेहाचे तुकडे करून निळ्या ड्रममध्ये भरले आणि त्यावर सिमेंट टाकून बंद करण्यात आले. 18 मार्च रोजी पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला आणि दुसऱ्याच दिवशी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. सध्या मुस्कान आणि साहिल मेरठ जिल्हा कारागृहात आहेत आणि खटला जिल्हा न्यायालयात सुरू आहे.

Saurabh Death Case: अटक झाल्यावेळी मुस्कान गर्भवती

मुस्कानला अटक होताच तिची गर्भावस्था उघड झाली. 24 नोव्हेंबर रोजी मेडिकल कॉलेजच्या वॉर्डात तिने एका मुलीला जन्म दिला, जिचे नाव राधा ठेवण्यात आले आहे. सध्या आई आणि मुलगी दोघीही कारागृहातच आहेत. इतर महिला कैद्यांनीही राधाची काळजी घेतल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले आहे. डॉक्टरांच्या अलीकडील तपासणीत दोघीही पूर्णपणे निरोगी असल्याचे स्पष्ट झाले.

Saurabh Death Case: साहिलला मुलीचा चेहरा दाखवण्यासाठी विनंती

मुस्कानने कारागृह प्रशासनाला विनंती केली होती की, तिची मुलगी राधा हिला साहिलला भेटू द्यावे आणि तिचा चेहरा त्याला दाखवावा. मात्र कारागृह अधीक्षक डॉ. वीरेश राज शर्मा यांनी सांगितले की, “तुरुंग नियमांनुसार अशा भेटीस परवानगी नाही.” तथापि, न्यायालयीन सुनावणीदरम्यान  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुस्कान मुलीला सोबत आणू शकते, आणि त्या वेळी साहिलला राधाचा चेहरा पाहता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Saurabh Death Case: 14 साक्षीदारांची साक्ष पूर्ण; खटला अंतिम टप्प्यात

सौरभ हत्याकांड प्रकरणातील सुनावणी आता महत्त्वपूर्ण टप्प्यात आली आहे. आतापर्यंत 14 साक्षीदारांचे साक्षीपुरावे नोंदवले गेले आहेत. यामध्ये पहिले तपास अधिकारी निरीक्षक करमवीर सिंह यांचाही समावेश आहे. मुख्य साक्षीदारांची संख्या जवळपास संपल्याने हा खटला लवकरच निकालाच्या दिशेने सरकेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  

Saurabh Death Case: नवीन मातेसाठी पॅरोलची तरतूद; तरीही मुस्कानकडून अर्ज नाही

दरम्यान, नियमांनुसार, नव्याने प्रसूती झालेल्या कैद्यांना सहा महिन्यांपर्यंत पॅरोल मिळू शकते, परंतु मुस्कानने अशा प्रकारचा कोणताही अर्ज अद्याप दाखल केलेला नाही. तुरुंगात आल्यानंतर तिच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीने तिची भेट घेतलेली नसल्याने ती सध्या आपल्या नवजात मुलीसहच कारागृहात राहत आहे.

आणखी वाचा 

Amba Ghat Bus Accident : सर्वजण साखरझोपेत असताना भीषण अपघात; नेपाळहून कोकणात कामासाठी निघालेली बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident In Jalgaon: इनोव्हा कारचा भीषण अपघात, तरुणीचा जागीच मृत्यू; कारचालक डॉ. उल्हास पाटील गंभीर जखमी, जळगावमधील घटना
इनोव्हा कारचा भीषण अपघात, तरुणीचा जागीच मृत्यू; कारचालक डॉ. उल्हास पाटील गंभीर जखमी, जळगावमधील घटना
Akola : अकोल्यात भाजपविरोधात सर्वपक्ष एकत्रित, बहुमताचा 41 चा आकडा गाठल्याचा दावा; महापौरपद ठाकरेंची शिवसेना किंवा वंचितकडे
अकोल्यात भाजपविरोधात सर्वपक्ष एकत्रित, बहुमताचा 41 चा आकडा गाठल्याचा दावा; महापौरपद ठाकरेंची शिवसेना किंवा वंचितकडे
Badlapur : बदलापूर पुन्हा हादरले, 4 वर्षांच्या चिमुकलीचं शाळेच्या व्हॅन चालकाकडून मारहाण करत लैंगिक शोषण, जमाव संतप्त 
बदलापूर पुन्हा हादरले, 4 वर्षांच्या चिमुकलीचं शाळेच्या व्हॅन चालकाकडून मारहाण करत लैंगिक शोषण, जमाव संतप्त 
Kolhapur : कोल्हापुरात राज्य उत्पादन शुक्लची मोठी कारवाई, 1.30 कोटींची गोवा बनावटी विदेशी दारू जप्त
कोल्हापुरात राज्य उत्पादन शुक्लची मोठी कारवाई, 1.30 कोटींची गोवा बनावटी विदेशी दारू जप्त
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Keral Crime News : सोशल मिडियावरच्या व्हिडीओने घतला जीव, व्हायरल व्हिडिओ ठरला आत्महत्येचं कारण
Anant Ambani Watch : अनंत अंबानींसाठी तब्बल १४ कोटींंचं घड्याळ, काय आहे वैशिष्ट्य? Special Report
Shanivarwada:पेशव्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक शनिवारवाड्याचा वर्धापनदिन Special Report
Vishal Bhardwaj on Nana Patekar : वेळ पाळत नाय, नानाचा काढता पाय! Special Report
Narayan kuche Audio Clip : कुचेंचा व्हिप लक्ष्मीदर्शनाची क्लिप; पैसे वाटपाचा संवाद Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident In Jalgaon: इनोव्हा कारचा भीषण अपघात, तरुणीचा जागीच मृत्यू; कारचालक डॉ. उल्हास पाटील गंभीर जखमी, जळगावमधील घटना
इनोव्हा कारचा भीषण अपघात, तरुणीचा जागीच मृत्यू; कारचालक डॉ. उल्हास पाटील गंभीर जखमी, जळगावमधील घटना
Akola : अकोल्यात भाजपविरोधात सर्वपक्ष एकत्रित, बहुमताचा 41 चा आकडा गाठल्याचा दावा; महापौरपद ठाकरेंची शिवसेना किंवा वंचितकडे
अकोल्यात भाजपविरोधात सर्वपक्ष एकत्रित, बहुमताचा 41 चा आकडा गाठल्याचा दावा; महापौरपद ठाकरेंची शिवसेना किंवा वंचितकडे
Badlapur : बदलापूर पुन्हा हादरले, 4 वर्षांच्या चिमुकलीचं शाळेच्या व्हॅन चालकाकडून मारहाण करत लैंगिक शोषण, जमाव संतप्त 
बदलापूर पुन्हा हादरले, 4 वर्षांच्या चिमुकलीचं शाळेच्या व्हॅन चालकाकडून मारहाण करत लैंगिक शोषण, जमाव संतप्त 
Kolhapur : कोल्हापुरात राज्य उत्पादन शुक्लची मोठी कारवाई, 1.30 कोटींची गोवा बनावटी विदेशी दारू जप्त
कोल्हापुरात राज्य उत्पादन शुक्लची मोठी कारवाई, 1.30 कोटींची गोवा बनावटी विदेशी दारू जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2026 | गुरुवार
ICC T20 World Cup: बांगलादेशचा भारतात टी-20 वर्ल्डकप खेळण्यास नकार; बदल्यात कोणाला लाॅटरी लागणार? 2009 मध्ये काय घडलं होतं?
बांगलादेशचा भारतात टी-20 वर्ल्डकप खेळण्यास नकार; बदल्यात कोणाला लाॅटरी लागणार? 2009 मध्ये काय घडलं होतं?
जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात लष्कराचे वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 10 जवान शहीद
जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात लष्कराचे वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 10 जवान शहीद
Kolhapur Municipal Corporation Mayor: कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
Embed widget