Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
अगोदर मतदारयादीतल्या घोळांमुळं निवडणूक आयोग विरोधकांच्या टार्गेटवर होता.
मग निवडणुक कार्यक्रमात केलेल्या बदलांमुळं सत्ताधाऱ्यांच्याही निशाण्यावर आला.
आता नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होऊन गेल्यानंतर निवडणूक आयोग स्थानिक उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्याही टार्गेटवर आलाय. निवडणुकांचे निकाल पुढे गेल्यामुळं मतदान यंत्रांच्या सुरक्षेचं मोठं आव्हान आयोगासमोर आणि प्रशासनासमोर आहे. मात्र मतदानानंतरच्या पहिल्या दोन दिवसांतच महाराष्ट्रातल्या अनेक भागात गोंधळ व्हायला सुरुवात झालीय. त्यामुळं आयोग नेमकं करतोय काय, असा सवाल उपस्थित झालाय.
नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकीतला गोंधळ संपता संपत नाहीय.
त्यामुळं निवडणूक आयोग आणि स्थानिक प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होतायत.
ज्यांच्यावर निवडणूक यंत्रांच्या सुरक्षेची जबाबदारी असते, त्यांनीच या यंत्रांसोबत छेडछाड केल्याचा आरोप गोंदियाच्या सालेकसामध्ये झाला.
पाहता पाहता ही बातमी गावभर पसरली आणि याचा निषेध करणाऱ्यांची एकच गर्दी स्ट्राँगरुमबाहेर जमा झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका कांबळे यांना हे प्रकरण इतकं भोवलं की थेट हकालपट्टीचा सामना करावा लागला.
अर्जूनी मोरगावचे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांच्याकडे मोनिका कांबळेंचा पदभार सोपवण्यात आला.
All Shows
































