एक्स्प्लोर

Pune Crime News: पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ

Pune Crime News: पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कडुस गावात भरदुपारी घडलेल्या एका जादूटोणाच्या प्रकारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Pune Crime News: पुणे (Pune) जिल्ह्याच्या खेड (Khed) तालुक्यातील कडुस गावात भरदुपारी काही संशयितांनी बंद घरासमोर जादूटोणा (Black Magic) केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. हा संपूर्ण प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कडुस गावातील लोकवस्तीतील एका जुन्या बंद घरासमोर हातात पिशवी घेऊन एक पुरुष भरदुपारी काहीतरी विधी करत होता. दारात दही–भात, लिंबू ठेवून त्यावर हळद–कुंकू लावले आणि त्यानंतर नारळ फोडले. इतकंच नव्हे तर या पुरुषासोबत एक चेहरा बांधलेली महिला सुद्धा होती. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

Pune Crime News: नागरिकांनी प्रश्न विचारला तर ‘मुंबईहून आलोय’ उत्तर

घटना घडत असताना काही नागरिकांनी त्या पुरुषाला विचारपूस केली असता तो “मुंबईहून आलोय” असे सांगून तिथून निघून गेला. मात्र त्याने कोणत्या कारणासाठी हे कृत्य केले, कोणाच्या सांगण्यावरून केले, याबद्दल काहीही स्पष्ट केले नाही.

Pune Crime News: जमिनीच्या वादातून जादूटोणा?

स्थानिकांच्या मते, या बंद घरासंबंधी मालमत्तेचा वाद सुरू आहे. त्यामुळे या वादातूनच विरोधकांना घाबरवण्यासाठी किंवा दडपण आणण्यासाठी हा जादूटोणा करण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला जातोय. अचानक घडलेल्या या घटनेमुळे गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून गावात अंधश्रद्धा आणि दहशतीची छाया पसरलीय. 

Pune Crime News: मौजमजेसाठी दागिने चोरणारा अट्टल चोर जाळ्यात

दरम्यान, पुण्यात मौजमजेच्या हव्यासातून दागिने चोरणाऱ्या अट्टल चोराला फुरसुंगी पोलिसांनी अटक केली आहे. राहुल उत्तम पठारे असे आरोपीचे नाव असून तो पुण्यातील विविध दुकानांत जाऊन सोन्याचे दागिने चोरत होता. चोरी केलेले दागिने विकून मिळालेला पैसा तो नर्तिकेवर खर्च करत असल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी आरोपीकडून 6 लाख रुपये किंमतीचे सुमारे 5 तोळे सोने जप्त केले असून पुढील तपास फुरसुंगी पोलीस करत आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Pune Leopard Attack: 'अंधारात मोबाईलवर बोलणं आलं अंगलट, बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी', नारायणगाव-जुन्नर रस्त्यालगतची थरारक घटना, रात्री सव्वा आठच्या सुमारास नेमकं काय घडलं?

Solapur Crime News: 12 वर्षांपासून रिलेशनशिप, दोन वर्षाचा संसार, भांडणानंतर त्यानं दुसरीकडे लग्नाचा घाट घातला, व्हिडिओ बनवून तृतीयपंथीयने गळ्याला लावला दोर, सोलापुरात नेमकं काय घडलं?

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
Crime News : आधी पत्नीला अन् बहिणीला मारले, नंतर 'हनुमान चालीसा' ऐकून स्वतःवर गोळी झाडली; लखनऊ हत्याकांडात धक्कादायक खुलासा
आधी पत्नीला अन् बहिणीला मारले, नंतर 'हनुमान चालीसा' ऐकून स्वतःवर गोळी झाडली; लखनऊ हत्याकांडात धक्कादायक खुलासा
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी
ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget