एक्स्प्लोर
Ganesh Chaturthi 2024: बाप्पा येतोय..! यंदाची सजावट करा हटके, सेलिब्रिटी स्टाईलवरून घ्या आयडिया
Ganesh Chaturthi 2024: लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी भाविक सज्ज झालेत. यंदा तुम्हीही बाप्पाला घरी बसवत असाल तर, तुम्ही सेलिब्रिटींकडून मागील वर्षातील सजावटीच्या काही आयडिया घेऊ शकता.

Ganesh Chaturthi 2024 lifestyle marathi news Decorate this year get ideas from celebrity
1/4

गणेश चतुर्थीच्या सजावटीची कल्पना अभिनेता सोनू सूदच्या घरच्या मंदिरातून देखील घेतली जाऊ शकते. त्यांच्या घराचे मंदिर पांढऱ्या ऑर्किडच्या फुलांनी आणि हिरव्या रंगाच्या कॉम्बिनेशने सजवण्यात आले आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्ही अशा प्रकारे मंडप किंवा गृहमंदिर सजवू शकता.
2/4

गणपतीला पिवळा रंग खूप आवडतो, म्हणून लोक झेंडूच्या फुलांनी जास्त सजवतात. अभिनेता चंकी पांडेच्या घराची सजावटही खूप सुंदर दिसते. झेंडूच्या फुलांनी अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरातील मंदिर किंवा मखर सजवू शकता.
3/4

अभिनेत्री दिया मिर्झाच्या बाप्पाचे मंदिरही सुंदर सजवण्यात आले आहे. पिवळी, पांढरी फुले आणि पानांची मोठी फ्रेम तयार करून तुम्ही तुमच्या मंदिराचे गेट बनवू शकता. या प्रकारची सजावट खूप सुंदर दिसते.
4/4

सारा अली खानचीही गणपती बाप्पावर श्रद्धा दिसून येते. तुम्हाला मंदिराच्या सजावटीची आयडिया येथून घेता येऊ शकते. गणपती बाप्पाला थोड्या उंच ठिकाणी ठेवा आणि मागील बाजूस पिवळ्या झेंडूच्या फुलांनी आणि आंब्याच्या पानांच्या तारांनी सजवा. तसेच सजावटीसाठी झेंडूसोबत पांढऱ्या फुलांचे कॉम्बिनेशन ठेवू शकता आणि तोरण सजवू शकता.
Published at : 05 Sep 2024 02:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
