एक्स्प्लोर
Paritosh Tripathi Wedding : छोट्या पडद्यावरील 'मामा'जी अडकला लग्नबंधनात; लग्नाचे फोटो पाहिलेत का?
Paritosh Tripathi Wedding : छोट्या पडद्यावरील 'मामा जी' या नावाने प्रसिद्ध असलेला अभिनेता परितोष त्रिपाठी लग्नबंधनात अडकला आहे
Paritosh Tripathi Wedding
1/10

Paritosh Tripathi Wedding : टीव्ही अभिनेता परितोष त्रिपाठीने नुकतेच उत्तराखंडमध्ये त्याची गर्लफ्रेंड मीनाक्षीबरोबर लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.
2/10

छोट्या पडद्यावरील 'मामा जी' या नावाने प्रसिद्ध असलेला अभिनेता परितोष त्रिपाठी लग्नबंधनात अडकला आहे. 9 डिसेंबर 2022 रोजी परितोषने त्याची मैत्रीण मीनाक्षीबरोबर उत्तराखंडमध्ये लग्न केले.
3/10

बी-टाउनपासून टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी परितोषच्या लग्नाला हजेरी लावली, ज्यात पंकज त्रिपाठी, गीता कपूर, ऋत्विक धनजानी यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश होता.
4/10

परितोष त्रिपाठीच्या लग्नाचे अनेक फोटो समोर आले आहेत. फोटोंमध्ये, सेलिब्रिटी परितोषच्या लग्नाचा आनंद लुटताना दिसतायत.
5/10

परितोषने पीच करलची शेरवानी परिधान केली होती. या शेरवानीवर गुलाबी रंगाच्या मोत्यांची माळही फार शोभून दिसत होती.
6/10

तर दुसरीकडे परितोषची नववधू पिंक कलरच्या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत होती. तिने पिंक लेहेंग्यावर गोल्ड ज्वेलरीसह लूक पूर्ण केला. लग्नात हे जोडपे 'मेड फॉर इच अदर' दिसत होते.
7/10

परितोष आणि मीनाक्षीचा लग्नमंडपही खूप सुंदर होता. त्यांच्या मंडपाची थीम गुलाबी होती आणि हा मंडप विविधरंगी फुलांनी सजविण्यात आला होता.
8/10

एका फोटोत पंकज त्रिपाठी परितोष आणि मीनाक्षी यांच्या विवाह सोहळ्याची विधी पूर्ण करताना दिसत आहेत. यावेळी पंकज विंटर आउटफिटमध्ये दिसत आहेत.
9/10

एका फोटोत, वधू -वर परितोष आणि मीनाक्षी बॉर्न फायरजवळ हात शेकताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत इतरही अनेक लोक दिसत आहेत.
10/10

सध्या परितोष आणि मीनाक्षीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
Published at : 11 Dec 2022 06:08 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















