अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची पसंती मिळतो. रितेशनं हिंदी चित्रपटसृष्टीबरोबरच मराठी चित्रपटसृष्टीत देखील विशेष ओळख निर्माण केली आहे.(Riteish Deshmukh/Instagram)
2/6
आज आषाढी एकादशीनिमित्त एक खास पोस्ट शेअर करुन रितेशनं वेड या चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे.(Riteish Deshmukh/Instagram)
3/6
रितेशनं बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सलमान आणि रितेश हे शूटिंग करताना दिसत आहेत. या फोटोला रितेशनं खास कॅप्शन देखील दिलं आहे. (Riteish Deshmukh/Instagram)
4/6
सलमान खानसोबतचे फोटो शेअर करुन रितेशनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पांडुरंगाच्या साक्षीने मी मराठी चित्रपटक्षेत्रात पाऊल ठेवलं आणि आज त्याच विठूमाऊलीच्या आषाढीला सांगतांना अतिशय आनंद होतोय की मी दिग्दर्शित केलेल्या पहिल्या मराठी चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं आहे .'(Riteish Deshmukh/Instagram)
5/6
'एका जिवाभावाच्या माणसाची साथ आमच्या चित्रपटाला लाभली ते म्हणजे ‘सलमान भाऊ’. माझ्या पहिल्या मराठी चित्रपटाला भाऊंनी लईभारी साथ दिली होती आता भाऊने माझ्या पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटात आणखी एक वेड केलंय. थॅक्यु भाऊ. लव यू. तुम्हा सर्वांच्या सदिच्छांमुळे वेड पूर्ण झाला आहे . आणि आता… वेडेपणा सुरु होणार आहे. तेव्हा भेटूया लवकरच...', असंही रितेशनं कॅप्शनमध्ये लिहिलं. (Riteish Deshmukh/Instagram)
6/6
वेड हा रितेशचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Riteish Deshmukh/Instagram)