एक्स्प्लोर

Sachin Ahir : राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...

Sachin Ahir On Rajya Sabha Election : आदित्य ठाकरे हे राज्यसभेची जागा शिवसेनेला मिळावी म्हणून आग्रही होते. मात्र अखेर शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. 

मुंबई : राज्यसभेच्या एका जागेवरून महाविकास आघाडीचं अखेर ठरलं आणि शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. शरद पवारांनी त्यांचा उमेदवारी अर्जदेखील भरला. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव, काँग्रेसचे सतेज पाटील, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र, यावेळी आदित्य ठाकरे उपस्थित नसल्याने त्याची चर्चा सुरू झाली. त्यावर ठाकरेंचे नेते सचिन अहिर यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 

महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एकमेव जागेवर आदित्य ठाकरे आग्रही होते. ही जागा कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला मिळावी यासाठी त्यांनी आग्रही भूमिका घेतली होती. त्याचवेळी राष्ट्रवादीने शरद पवारांचं नाव पुढे केलं. अशाही परिस्थितीत ही जागा आपल्यालाच मिळवी यासाठी आदित्य ठाकरे आग्रही होते. नंतर काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडीकडून शरद पवारांचं नाव अंतिम झालं.

या सर्व घडामोडी घडत असताना आदित्य ठाकरे मात्र नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यामुळेच आदित्य ठाकरे हे शरद पवारांचा फॉर्म भरण्यासाठी आले नाहीत अशी कुजबूजही सुरू झाली. मात्र आता सचिन अहिर यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 

काय म्हणाले सचिन अहिर?

सचिन अहिर म्हणाले की, आदित्य ठाकरे हे या जागेबद्दल बोलले होते हे नाकारता येत नाही. मात्र निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला. जंयंत पाटील, सुप्रिया सुळे हे उद्धव ठाकरेंना भेटले आणि चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेतला असेल. आदित्य ठाकरे हे आले नसले तरी शरद पवार यांचा अर्ज भरताना आमचे नेते भास्कर जाधव, अनिल परब आणि आपण स्वतः उपस्थित होतो. काल पत्रकार परिषद झाली तेव्हा आम्ही उपस्थित राहायचं असा काही ठरलं नव्हतं. त्यामुळे त्या दोन पक्षांनी पत्रकार परिषद घेतली. पण आमचा पाठिंबा त्यांना आहे.  

आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे अर्जुन तेंडुलकर यांच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिले. त्यामुळेच ते पवारांचा अर्ज भरताना उपस्थित राहू शकले नाहीत असं सचिन अहिर यांनी स्पष्ट केलं. 

Maharashtra Candidate List Rajya Sabha Election : राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून कोणाला उमेदवारी? 

भाजपचे उमेदवार- (BJP Rajya Sabha Election Candidate List)

  • रामदास आठवले (Ramdas Athawale) 
  • विनोद तावडे (Vinod Tawde) 
  • माया चिंतामण ईवनाते (Maya Ivnate) 
  • रामराव वडकुते (Ramrao Wadkute) 

शिवसेना शिंदे गट- ज्योती वाघमारे

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट- पार्थ पवार (Parth Pawar)

महाविकास आघाडी - शरद पवार (Sharad Pawar)

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Pratap Sarnaik: मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Ladaki Bahin Yojana :लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
Mumbai Crime News: मुंबई हादरली! दादरमध्ये मुलाने चाकूने वार करुन जन्मदात्या आईला संपवलं, एडवर्ड फर्नांडिस पोलिसांच्या ताब्यात
मुंबई हादरली! दादरमध्ये मुलाने चाकूने वार करुन जन्मदात्या आईला संपवलं, एडवर्ड फर्नांडिस पोलिसांच्या ताब्यात

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवमान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवमान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Embed widget