एक्स्प्लोर
Dhanush : धनुषचा 'देसी लूक'; 'द ग्रे मॅन' च्या प्रीमिअरला लावली हजेरी
अभिनेता धनुषनं दाक्षिणात्य चित्रपसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे.
dhanush
1/7

अभिनेता धनुषनं दाक्षिणात्य चित्रपसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. धनुष त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो.
2/7

धनुष हा 'द ग्रे मॅन' (The Gray Man) या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.
3/7

'द ग्रे मॅन' चित्रपटाचा नुकताच प्रीमिअर शो पार पडला. या प्रीमिअरला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. अनेक वेळा प्रीमिअरमध्ये सेलिब्रिटींना तुम्ही सूट,फॉर्मल ड्रेस किंवा डिझायनर ड्रेसमध्ये पाहिलं असेल पण धनुषनं मात्र 'द ग्रे मॅन' चित्रपटाच्या प्रीमिअरला देसी लूक केला होता. धनुषच्या या लूकचं अनेकांनी कौतुक केलं आहे.
4/7

धनुषचा द ग्रे मॅन हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा स्पेशल प्रीमिअर हा गुरुवारी (21 जुलै) संध्याकाळी मुंबईमध्ये पार पडला. प्रीमिअरला उपस्थित असलेल्या सर्व कलाकार तसेच इतर दिग्गजांनी फॉर्मल लूक केला होता. पण धनुषच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. व्हाईट शर्ट, ट्रेडिशनल व्हाईट वेष्टी (लुंगी), हातात घड्याळ असा लूक धनुषनं केला होता.
5/7

नेटफ्लिक्सच्या सोशल मीडिया पेजवरुन धनुषच्या या ट्रेडिशनल लूकचे काही फोटो शेअर करण्यात आले. या फोटोला कमेंट करुन नेटकऱ्यांनी धनुषच्या फोटोचं कौतुक केलं आहे.
6/7

गेल्या वर्षी नवी दिल्ली येथे पार पडलेल्या 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला धनुष उपस्थित होता. या सोहळ्यामध्ये धनुषला असुरन या चित्रपटातील अभिनयासाठी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. तेव्हा देखील त्यानं ट्रेडिशनल लूक केला होता.
7/7

ग्रे-मॅनच्या प्रीमिअरला बॉलिवूडबरोबरच काही हॉलिवूड कलाकारांनी देखील हजेरी लावली होती. विक्की कौशल, रणदीप हुड्डा हे कलाकार प्रीमिअरला उपस्थित होते. द ग्रे मॅन हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 22 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
Published at : 22 Jul 2022 01:36 PM (IST)
आणखी पाहा























