एक्स्प्लोर

Subedar Review:सत्तरीच्या उंबरठ्यावर अनिल कपूरचा Action अवतार! आदित्य रावलचा धडकी भरवणारा व्हिलन, ‘सुबेदार’ कसा आहे?

Subedaar Review: या चित्रपटात हिरोची हिरोगिरी अधिक उठून दिसते ती विलनमुळे - आणि तो विलन म्हणजे आदित्य रावल. कारण हिरो तेव्हाच चमकतो, जेव्हा समोरचा विलनही तितकाच दमदार असतो.

Subedar review: एक 69 वर्षांचा हिरो… होय. हिरो. 69 वर्षांचा हिरो पडद्यावर काय करू शकतो, हे ही फिल्म पाहिल्यावर कळतं. 69 वर्षांचा अभिनेता पडद्यावर किती दमदार काम करू शकतो, याचं उदाहरण या चित्रपटातून पाहायला मिळतं. कधी कधी तो कमकुवत कथेलाही आपल्या अभिनयाने उंचीवर नेऊ शकतो. इतकंच नाही, तर त्याच्यापेक्षा निम्म्या वयाचे हिरोही जे करू शकत नाहीत, ते तो सहज करून दाखवतो. अनिल कपूर यांनी या चित्रपटात नेमकं तेच करून दाखवलं आहे. प्राइम व्हिडिओवर (Amazon Prime) आलेली ही फिल्म पाहण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे अनिल कपूर ज्यांनी जणू ‘हिरो’ या संकल्पनेलाच पुन्हा नवं आयुष्य दिलं आहे. (Subedaar Movie Review)

Subedaar Film: कहाणी

ही कथा आहे निवृत्त फौजी अर्जुन मौर्याची. तो एका माफियाकडे काम मागण्यासाठी जातो. त्याची पत्नी आता हयात नाही आणि त्याच्या तरुण मुलीसोबत त्याचं फारसं जमतही नाही. पण या माफिया आणि या सुबेदार यांच्यात पुढे असं काही घडतं की दोघांमध्ये जबरदस्त टक्कर पाहायला मिळते. ही टक्कर नेमकी कशी होते, हे तुम्हाला प्राइम व्हिडिओवर पाहायला मिळेल.

फिल्म कशी आहे?

खरंतर ही फिल्म ठीकठाकच आहे. फिल्मची कथा काही फार खास नाही. ट्रेलर पाहिल्यावरच कथानकाची दिशा साधारण कळते. तरीही ही फिल्म पाहण्याचं मोठं कारण म्हणजे यातले दमदार कलाकार.अनिल कपूर यांनी यात जबरदस्त काम केलं आहे. त्यांचा अॅक्शन, इमोशन आणि राग- तिन्ही गोष्टी पडद्यावर प्रभावी वाटतात. योग्य संधी मिळाली तर 69 वर्षांचा हिरोही पडद्यावर धुमाकूळ घालू शकतो, हे त्यांनी पुन्हा सिद्ध केलं आहे. त्यांनी हे पात्र ज्या ताकदीने साकारलं आहे, ते खरंच कौतुकास्पद आहे.

या चित्रपटात हिरोची हिरोगिरी अधिक उठून दिसते ती विलनमुळे - आणि तो विलन म्हणजे आदित्य रावल. कारण हिरो तेव्हाच चमकतो, जेव्हा समोरचा विलनही तितकाच दमदार असतो. आदित्य रावलने आतापर्यंतचा आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स दिला आहे. पडद्यावर तो खूप धोकादायक आणि भयानक वाटतो. त्याची उपस्थितीच वेगळा दहशतीचा माहोल तयार करते. अनिल कपूरसारख्या अनुभवी अभिनेत्याला तो जोरदार टक्कर देताना दिसतो.

फैसल मलिक यांनीही छान काम केलं आहे. ‘सॉफ्टी’ नावाचं त्यांचं पात्र त्यांच्या आधीच्या भूमिकांपेक्षा खूप वेगळं आहे. तो असा माफिया आहे जो शांत असतो, पण शेवटी जेव्हा तो ओरडतो तेव्हा अक्षरशः कहर करतो. सौरभ शुक्ला यांनी पुन्हा एकदा चांगलं काम केलं आहे. मोना सिंग यांची भूमिका दमदार आहे. राधिका मदानच्या पात्रातून तरुण मुलींना काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. कॉलेजमध्ये मुलं त्रास देतात तेव्हा ती ज्या पद्धतीने त्यांना सामोरी जाते, ते पाहायला चांगलं वाटतं आणि राधिकाने ही भूमिका ठामपणे साकारली आहे. खुशबू सुंदर छोट्याशा भूमिकेतही लक्षात राहते.

लेखन आणि दिग्दर्शन

सुरेश त्रिवेणी आणि प्रज्ज्वल चंद्रशेखर यांचं लेखन कमकुवत वाटतं. फिल्ममध्ये अजून थोडा मसाला असायला हवा होता. काही प्रश्न अनुत्तरित राहतात आणि त्यांची उत्तरं मिळणं गरजेचं होतं. दिग्दर्शन ठीक आहे. मध्य प्रदेशचा फील चांगल्या प्रकारे तयार करण्यात आला आहे. फिल्मला रॉ ठेवण्यात आलं आहे. व्हीएफएक्सचा वापर केलेला नाही आणि रिअल लोकेशन्सवर शूटिंग करण्यात आलं आहे.एकंदरीत,अनिल कपूर आणि इतर कलाकारांच्या दमदार अभिनयासाठी ही फिल्म नक्कीच पाहता येईल.

रेटिंग - ३ स्टार्स 

View More
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Director David Dhawan On Retirement: 'मला आता आणखी काम नाही करायचं...', गोविंदाला सुपरस्टार बनवणाऱ्या दिग्गज दिग्दर्शकाची बॉलिवूडमधून निवृत्ती? स्वतःच केला खळबळजनक खुलासा...
'मला आता आणखी काम नाही करायचं...', गोविंदाला सुपरस्टार बनवणाऱ्या दिग्दर्शकाची बॉलिवूडमधून निवृती?
Haryanvi Actress Divyanka Sirohi Dies Heart Attack: वयाच्या 30 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीनं घेतला अखेरचा श्वास; हृदयविकाराचा झटका ठरलं मृत्यूचं कारण
वयाच्या 30 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीनं घेतला अखेरचा श्वास; हृदयविकाराचा झटका ठरलं मृत्यूचं कारण
Sukesh Chandrashekhar : प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ, तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतोय; माफीची साक्षीदार होण्याऱ्या जॅकलिनला सुकेशचे तुरुंगातून पत्र
प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ, तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतोय; माफीची साक्षीदार होण्याऱ्या जॅकलिनला सुकेशचे तुरुंगातून पत्र
Raja Shivaji Shooting Places: 100 कोटींचं बजेट,10 वर्षांची मेहनत; 'राजा शिवाजी' चं शुटींग महाराष्ट्रात कुठे कुठे झालंय?
100 कोटींचं बजेट,10 वर्षांची मेहनत; 'राजा शिवाजी' चं शुटींग महाराष्ट्रात कुठे कुठे झालंय?
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Worli Traffic : मुंबईत ट्रॅफिकला ब्रेक, महिलेचा उद्रेक Special Report
Beed Walmik Karad News Audio Clip : वाल्मिक कराड गँगची तुरुंगात पुन्हा दहशत?
Amol Mitkari On Murlidhar Mohol :ब्लॅक बॉक्स कुठे? विमानाचा CCTV कुठे? मोहोळांनी माफी मागावी-मिटकरी
Nashik TCS Case : निर्लज्जपणाचा कहर नराधमांच्या हाती पदर Special Report
Sanjay Dutt Movie : काँग्रेसच्या भुमिकेमुळे संजय दत्तच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime news: मोठी बातमी: महिला क्रिकेटरने मुंबईतील उद्योगपतीला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवलं, 63 लाख उकळले, पोलिसांकडून अटकेची कारवाई
मोठी बातमी: महिला क्रिकेटरने मुंबईतील उद्योगपतीला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवलं, 63 लाख उकळले, पोलिसांकडून अटकेची कारवाई
Maharashtra Live blog updates: बारामतीत पोटनिवडणुकीसाठी मतदान; मात्र, शरद पवार मतदानाचा हक्क बजावू शकणार नाहीत
Maharashtra Live blog updates: बारामतीत पोटनिवडणुकीसाठी मतदान; मात्र, शरद पवार मतदानाचा हक्क बजावू शकणार नाहीत
Ulhasnagar Clash : उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष, केवळ एक नगरसेवक असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद दिल्याने गोंधळ
उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष, केवळ एक नगरसेवक असलेल्या काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद दिल्याने गोंधळ
Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेतून 21 वर्ष पूर्ण होण्याअगोदर पैसे काढता येतात का?  जाणून घ्या कधी पैसे काढता येतात? प्रक्रिया काय असते? 
सुकन्या समृद्धी योजनेतून 21 वर्ष पूर्ण होण्याअगोदर पैसे काढता येतात का? प्रक्रिया काय असते? 
Sukesh Chandrashekhar : प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ, तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतोय; माफीची साक्षीदार होण्याऱ्या जॅकलिनला सुकेशचे तुरुंगातून पत्र
प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ, तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतोय; माफीची साक्षीदार होण्याऱ्या जॅकलिनला सुकेशचे तुरुंगातून पत्र
विवस्त्र व्हिडीओ कॉल करते, 20 हजार दे; प्रसिद्ध अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे 'नको ते चॅट्स' व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
विवस्त्र व्हिडीओ कॉल करते, 20 हजार दे; प्रसिद्ध अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे 'नको ते चॅट्स' व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Baramati Byelection 2026 Sunetra Pawar: अजित पवार नाहीत, शरद पवारही आजारी; सुनेत्रा पवारांचा कंठ बोलताना दाटून आला, म्हणाल्या...
अजित पवार नाहीत, शरद पवारही आजारी; सुनेत्रा पवारांचा कंठ बोलताना दाटून आला, म्हणाल्या...
Madha Clash : ओळखपत्र मागितल्याने उत्पादन शुल्क अधिकारी चिडले, धाबेवाल्याला मारहाण; नंतर ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना चांगलंच चोपलं
ओळखपत्र मागितल्याने उत्पादन शुल्क अधिकारी चिडले, धाबेवाल्याला मारहाण; नंतर ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना चांगलंच चोपलं
Embed widget