Allu Arjun Luxury Lifestyle : सध्या पुष्पा: द राइज (Pushpa: The Rise) या चित्रपटाने लोकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे.
2/7
या चित्रपटातील अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
3/7
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे. रिपोर्टनुसार या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी अल्लू अर्जुननं 50 कोटी रूपये मानधन घेतलं होते.
4/7
रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुनचं आलिशान घर हे हैद्राबाद येथे आहे. त्याच्या या घराची किंमत 100 कोटी रूपये आहे. तसेच अल्लू अर्जुनकडे आलिशान व्हॅनिटी व्हॅन देखील आहे. रिपोर्टनुसार या व्हॅनिटीची किंमत 8 कोटी रूपये आहे.
5/7
एवढच नाही तर अल्लू अर्जुनकडे लग्झरी कार्सचं कलेक्शन देखील आहे. त्याच्याकडे Hummer H2, रेंज रोव्हर वोग, वॉल्वो XC90 T8 या गाड्या आहेत.
6/7
कार्सबरोबरच अल्लू अर्जुनकडे प्रायव्हेट जेट देखील आहे. या प्रायव्हेट जेटमधून फिरतानाचे फोटो अल्लू अर्जुन सोशल मीडियावर शेअर करतो.
7/7
अल्लू अर्जुनने 2011 मध्ये स्नेहा रेड्डीसोबत लग्नगाठ बांधली. त्याच्या लग्न समारंभ त्यावेळी चर्चेत होता. जवळपास 100 कोटी रूपये या समारंभासाठी खर्च करण्यात आले होते. (All photo credit: alluarjunonline/ig)