एक्स्प्लोर

Amitabh Bachchan: टीम इंडियाच्या विजयावर बिग बींनी लिहिलं असं काही की, नेटकरी म्हणाले, 'विनंती करतो, तुम्ही क्रिकेट पाहूच नका...'

अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील सर्वाधिक सक्रिय कलाकारांपैकी एक मानले जातात. ते ट्विटरवर नियमितपणे छोटे-छोटे पोस्ट करत असतात.

Amitabh Bachchan: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयम येथे रविवारी ICC Men's T20 World Cup 2026 च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत इतिहास रचला. या विजयासह टीम इंडियाने तिसऱ्यांदा टी20 विश्वचषक जिंकत मोठी कामगिरी केली. देशभरात या विजयानंतर दिवाळीसारखा जल्लोष पाहायला मिळाला.भारताच्या या शानदार विजयावर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून टीम इंडियाचे अभिनंदन केले. त्यात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही खास अंदाजात प्रतिक्रिया दिली. मात्र त्यांचे हे ट्विट आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे.

अमिताभ बच्चन यांचे ट्विट चर्चेत

अमिताभ बच्चन यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले,“कहा था नहीं देखूंगा तो जीत जाएंगे! हो गया.” म्हणजेच, मी सामना पाहिला नाही म्हणून भारत जिंकला, असा हलक्याफुलक्या अंदाजात त्यांनी उल्लेख केला.अनेक क्रिकेट चाहत्यांप्रमाणेच भारत जिंकावा म्हणून सामना न पाहण्याचं त्यांनी म्हटल्याचे या पोस्टमधून दिसून आले.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

मात्र या ट्विटनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. काहींनी मजेत त्यांना “पनौती” असेही म्हटले. एका यूजरने लिहिले,“म्हणजे 2023 चा वर्ल्ड कप आपण तुमच्यामुळे हरलो का?” तर दुसऱ्याने लिहिले,“सर, पुढील 10 वर्षे तुम्ही टीव्हीच पाहू नका, आपण सगळे ट्रॉफी जिंकू!” काही चाहत्यांनी मात्र अमिताभ बच्चन यांना पाठिंबा देत लिहिले की, तेही भारत जिंकावा म्हणून सामना पाहत नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावर या पोस्टवर मजेशीर चर्चा रंगली आहे.


Amitabh Bachchan: टीम इंडियाच्या विजयावर बिग बींनी लिहिलं असं काही की, नेटकरी म्हणाले, 'विनंती करतो, तुम्ही क्रिकेट पाहूच नका...

सोशल मीडियावर सक्रिय

अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील सर्वाधिक सक्रिय कलाकारांपैकी एक मानले जातात. ते x माध्यमावर नियमितपणे अनेक पोस्ट करत असतात. त्यांच्या काही पोस्टचा अर्थ समजून घेण्यासाठी चाहत्यांना बरीच चर्चा करावी लागते.

अमिताभ बच्चन यांच्या कामाबाबत बोलायचे झाल्यास अमिताभ बच्चन लवकरच 'कल्की  2898 AD Part 2' या चित्रपटात अश्वत्थामाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच ब्रम्हास्त्र पार्ट 2 मध्येही ते गुरुच्या भूमिकेत झळकणार असल्याचे सांगितले जात आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime Thriller On OTT: थरकाप उडवणाऱ्या कोर्टरूम ड्रामाचा OTTवर धुमाकूळ, इतका भयंकर क्राईम की डोकं चक्रावून जाईल
थरकाप उडवणाऱ्या कोर्टरूम ड्रामाचा OTTवर धुमाकूळ, इतका भयंकर क्राईम की डोकं चक्रावून जाईल
Suraj Chavan: 'तुम्हाला गुड न्यूज मिळणार..' बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाणकडून मोठा खुलासा; स्पर्धकांसमोर लाजला
'तुम्हाला गुड न्यूज मिळणार..' बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाणकडून मोठा खुलासा; स्पर्धकांसमोर लाजला
Deepika Padukone pregnant Ranveer singh: दीपिका पदुकोणने पुन्हा गोड बातमी दिली, घरी चिमुकला पाहुणा येणार, रणवीर सिंग बाबा होणार
दीपिका पदुकोणने पुन्हा गोड बातमी दिली, घरी चिमुकला पाहुणा येणार, रणवीर सिंग बाबा होणार
Bigg Boss Marathi: विजेता म्हणून ज्या नावाची चर्चा तोच स्पर्धक OUT? फिनालेच्या काही तास आधीच बिग बॉसच्या घरात काय घडलं?
विजेता म्हणून ज्या नावाची चर्चा तोच स्पर्धक OUT? फिनालेच्या काही तास आधीच बिग बॉसच्या घरात काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rohit Pawar Latur : VSR कंपनीच्या मालकांना सरकार एवढे का घाबरत आहे? रोहित पवार यांचा सवाल
PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी
PM Modi on Women Reservation Bill : काँग्रेसने त्यांचं अस्तित्व गमावलं तुफान हल्लाबोल
PM Modi on Women Reservation Bill : नारीशक्ती विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाट, पोलीसही चक्रावले
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाट, पोलीसही चक्रावले
Ravichandran Ashwin: चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
घरच्या मैदानात आरसीबी हरताच कॅप्टन रजत पाटीदारचा संताप अनावर; नेमकं काय म्हणाला?
घरच्या मैदानात आरसीबी हरताच कॅप्टन रजत पाटीदारचा संताप अनावर; नेमकं काय म्हणाला?
Video: बाॅम्बवर्षावातही माऊलीची नवजात बालकांना वाचवण्याची धडपड, जीवाच्या आकांताने पळापळ, आयसीयूतील रुग्ण रस्त्यावर; इराणी हॉस्पिटलवर अमेरिका-इस्त्रायलच्या नरसंहार हल्ल्याचा सव्वा दोन मिनिटांचा भयावह व्हिडिओ
Video: बाॅम्बवर्षावातही माऊलीची नवजात बालकांना वाचवण्याची धडपड, जीवाच्या आकांताने पळापळ, आयसीयूतील रुग्ण रस्त्यावर; इराणी हॉस्पिटलवर अमेरिका-इस्त्रायलच्या नरसंहार हल्ल्याचा सव्वा दोन मिनिटांचा भयावह व्हिडिओ
IPL 2026 Points Table: चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत हैदराबादची मोठी झेप; ‘हा’ संघ बाहेर पडणार? पाहा कोणता संघ कोणत्या स्थानावर?
चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत हैदराबादची मोठी झेप; ‘हा’ संघ बाहेर पडणार? पाहा कोणता संघ कोणत्या स्थानावर?
Pune Crime News : खळबळजनक! मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु
खळबळजनक! मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु
Bhandara Crime News: भंडाऱ्यात गो तस्करांची मुजोरी, थेट पोलिसाची कॉलर पकडून धक्काबुक्की अन्...; नेमकं काय घडलं?
भंडाऱ्यात गो तस्करांची मुजोरी, थेट पोलिसाची कॉलर पकडून धक्काबुक्की अन्...; नेमकं काय घडलं?
Jaykumar Gore : राज्यावर एल निनोचं संकट, उन्हाळ्यात एकच पाण्याचे आवर्तन, उजनी धरणाच्या पाण्याचा काटकसरीने वापर, पालकमंत्री जयकुमार गोरेंचं सोलापूरकरांना आवाहन
राज्यावर एल निनोचं संकट, उन्हाळ्यात एकच पाण्याचे आवर्तन, उजनी धरणाच्या पाण्याचा काटकसरीने वापर, पालकमंत्री जयकुमार गोरेंचं सोलापूरकरांना आवाहन
Embed widget