एक्स्प्लोर
Amit Thackeray: अमित ठाकरेंना आशिष शेलारांचा 'मनसे' पाठिंबा; उद्धव ठाकरेंना टोला, शिंदे-फडणवीस-पवारांना भेटणार
Amit Thackeray Mahim Vidhan Sabha: माहीम विधानसभेवरुन महायुतीमध्ये हालचालींना वेग आला आहे.
Amit_Thackeray_Mahim_Vidhan_Sabha
1/8

मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाचा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
2/8

अमित ठाकरेंसाठी माहीम विधानसभेतील ही लढाई सोपी नसणार आहे. कारण या ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे.
3/8

ठाकरे घराण्यातील अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूक लढवत असल्याने शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाकडून कोणालाही उमेदवारी देणार नाही, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र शिंदे गट आणि ठाकरे गटाने अमित ठाकरेंविरोधात उमेदवारी उतरवला आणि माहीम विधानसभेतील ही लढत तिरंगी लढत रंगणार आहे.
4/8

महायुतीचे आणि शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर आपली उमेदवारी मागे घेणार अशा चर्चा सध्या रंगली आहे. याचदरम्यान भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मोठं विधान केलं आहे.
5/8

हिंदुत्वाची भूमिका घेणारे आम्हाला मदत करणारे आणि नातेसंबंध जपणारे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे मैदानात उतरले असतील, तर आपणही नाते जपायला हवे, असं आशिष शेलार म्हणाले.
6/8

भले उद्धव ठाकरेंना वाटत नसेल तरी महायुतीने नाते जपावे, असं आवाहन आशिष शेलार यांनी केलं.
7/8

माहीम विधानसभेवरुन मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचं देखील आशिष शेलार पत्रकार परिषेदत म्हणाले.
8/8

आपल्याच घरातील अमित ठाकरे निवडणूक लढत असेल तर महायुतीमधून एकत्र येऊन समर्थन (निवडून) देऊ असे मला वाटतेय, असंही आशिष शेलार यांनी सांगितले. आशिष शेलार यांच्या या विधानामुळे अमित ठाकरेंना त्यांनी 'मनसे' पाठिंबा असल्याचं बोललं जात आहे. तर महायुती आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच माहीम विधानसभेवरुन महायुतीमध्ये हालचालींना वेग आला आहे.
Published at : 26 Oct 2024 03:02 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























