एक्स्प्लोर

मोठी बातमी : शरद पवार स्वत: आले नाहीत, निवडणूक अधिकाऱ्यांकडून घरी जाऊन प्रक्रिया पूर्ण, महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली घटना

Sharad Pawar: शरद पवार यांनी आज महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

मुंबई: आज राज्यसभेसाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले, यामध्ये भाजपचे चार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक आणि शिवसेना पक्षाचा एक तर महाविकास आघाडीकडून शरद पवारांनी (Sharad Pawar) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शरद पवार यांनी आज महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र महाराष्ट्रात पहिल्यांदाच प्रत्यक्ष उपस्थित न राहता अशा पद्धतीने शरद पवार (Sharad Pawar) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  

शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची शपथ घेतली

पशुपतीनाथ विरुद्ध हरिहर प्रसाद सिंग १९६८ साली सुप्रीम कोर्टात निवाडा झाला होता. यावेळीआरोग्यासह कुठल्या ही वैध कारणास्तव  उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित नसेल तर संविधानाच्या कलम ८४ अ प्रमाणे विहीत नमुन्यात शपथपत्र सादर करण अनिवार्य असते. जेजे रुग्णालयाचे अधिक्षक संजय सुरवसे यांनी आज शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची शपथ घेतली. त्यानंतर शरद पवारांचे प्रस्तावक जयंत पाटील यांनी सदर अर्ज विधीमंडळात येऊन निवडणूक अधिकारी यांना सादर केला. पवारांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. एक पक्षाकडून आणि दुसरा अपक्ष, खबरदारीचा उपाय म्हणून दोन अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नसेल तर या तरतुदीनुसार उमेदवारी अर्ज दाखल करु शकतो. महाराष्ट्रात शरद पवार यांनी पहिल्यांदाच असा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.(Sharad Pawar)

निवडणूक बिनविरोध होणार

राज्यसभेच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ट्विस्ट आला आहे. दोन उमेदवार देण्याची चर्चा असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेने अखेर एकच उमेदवार दिला आहे. ज्योती वाघमारे यांनी अर्ज सादर केला असून रोहित टिळकांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला नाही. त्यामुळे राज्यातील सात जागांसाठी अखेर सात अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून चार, राष्ट्रवादीकडून एक आणि शिवसेनेकडून एक असे सहा अर्ज दाखल झाले आहेत. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून शरद पवारांचा अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध झाल्याचं समोर आलं आहे. 

शरद पवार-पार्थ पवारांचे दोन अर्ज

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शरद पवारांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. त्याचसोबत राष्ट्रवादीच्या पार्थ पवारांनी आणि शिवसेनेच्या ज्योती वाघमारेंनी दोन अर्ज दाखल केले आहेत. एकादा अर्ज जरी चुकून बाद झाला तरी दुसरा अर्ज कायम राहणार आहे. 

दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी शरद पवार उपस्थित राहू शकले नाहीत. तब्येतीच्या कारणामुळे त्यांना हजर राहता आलं नाही. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या घरी जाऊन सगळी प्रक्रिया पूर्ण केली. आजारी व्यक्ती राज्यसभेचा अर्ज दाखल करण्यासाठी येऊ शकला नाही अशी पहिलीच घटना घडली. 

Maharashtra Candidate List Rajya Sabha Election : राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून कोणाला उमेदवारी? 

भाजपचे उमेदवार- (BJP Rajya Sabha Election Candidate List)

रामदास आठवले (Ramdas Athawale) 
विनोद तावडे (Vinod Tawde) 
माया चिंतामण ईवनाते (Maya Ivnate) 
रामराव वडकुते (Ramrao Wadkute) 

शिवसेना शिंदे गट-
ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट-
पार्थ पवार (Parth Pawar)

महाविकास आघाडी -
 शरद पवार (Sharad Pawar)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
Video: आदित्य ठाकरेंनी महिलेला मारलं, निशिकांत दुबेंच्या आरोपाने सभागृह तापलं, अरविंद सावंत कडाडून म्हणाले, तडीपार माणसाचं नाव घेऊ का?
Video: आदित्य ठाकरेंनी महिलेला मारलं, निशिकांत दुबेंच्या आरोपाने सभागृह तापलं, अरविंद सावंत कडाडून म्हणाले, तडीपार माणसाचं नाव घेऊ का?
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: विधान परिषद निवडणूक जाहीर, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं मोठं वक्तव्य; सपकाळ म्हणाले, 'उद्धव ठाकरे ⁠विधान परिषदेवर जात असतील तर आमचा पाठिंबा, पण...'
विधान परिषद निवडणूक जाहीर, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं मोठं वक्तव्य; सपकाळ म्हणाले, 'उद्धव ठाकरे ⁠विधान परिषदेवर जात असतील तर आमचा पाठिंबा, पण...'
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट, 10 उमेदवारांसाठी एकाच दिवशी दोनवेळा मतदान, मतदानाआधीच महायुतीचा एक विजय निश्चित, प्रज्ञा सातवांच्या रिक्त जागेवरही पोटनिवडणूक!
विधान परिषद निवडणुकीत ट्विस्ट, 10 उमेदवारांसाठी एकाच दिवशी दोनवेळा मतदान, मतदानाआधीच महायुतीचा एक विजय निश्चित, प्रज्ञा सातवांच्या रिक्त जागेवरही पोटनिवडणूक!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shreyas Iyer : सरपंच श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनच्या साथीनं हार्दिक पांड्याचा करेक्ट कार्यक्रम, रोहित-सूर्या पाहत राहिले, पाहा व्हिडिओ
श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनची अचूक साथ, रोहित-सूर्या पाहत राहिले
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्त्रायल-लेबनॉनच्या शस्त्रसंधीची घोषणा, दोन्ही देशांचे नेते 34 वर्षानंतर भेटले
ट्रम्प यांच्याकडून आणखी एका युद्धाच्या शस्त्रसंधीची घोषणा, इस्त्रायल-लेबनॉन संघर्षाला 10 दिवस ब्रेक
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
MI vs PBKS : वानखेडेवर पंजाबच्या प्रभसिमरन आणि श्रेयस अय्यरचं वादळ,  पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर
पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर,वानखेडेवर प्रभसिमरन आणि श्रेयसचं वादळ
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
Suryakumar Yadav : रोहित दुखापतीमुळं संघाबाहेर सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद, अर्शदीप सिंगचा धमाका
सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद,अर्शदीप सिंगचा धमाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
Embed widget