एक्स्प्लोर
Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात तेजी, सोनं 900 रुपयांपर्यंत वाढलं, आजचे दर नेमके किती?
Gold Rate : भारतात सलग तिसऱ्या दिवसात सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. चांदीच्या दरात देखील 500 रुपयांची वाढ झाली आहे.

सोने अन् चांदीच्या दरात वाढ
1/5

भारतात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. सराफा बाजारात आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 390 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्रॅमचा दर 77469 रुपये आहे.
2/5

चांदीच्या दरात देखील 500 रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. एक किलो चांदीचा दर 87667 रुपये इतका आहे. हे दर इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं जारी केलेले आहेत. हे दर IBJA नं जारी केलेले असून दुकानांमधील दर 200 हजारांपेक्षा अधिक असू शकतात.
3/5

विविध शहरांमध्ये ग्राहकांना सोने खरेदी करायचं असल्यास त्यामध्ये साधारण 900 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. दिल्ली, चंदीगड, जयपूर, लखनौ, पाटणा या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 79350 रुपये आहे. या शहरात सोन्याच्या दरात 870 रुपयांची वाढ झाली आहे.
4/5

मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, नागपूर या शहरांमध्ये 870 रुपयांची वाढ होऊन ते 79200 रुपयांपर्यंत पोहोचलं आहे.अहमदाबादमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा दर 79250 रुपये आहे.
5/5

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात 110 रुपयांची वाढ झाली होती. तिथं सोन्याचा दर 77828 रुपये होता. तर, एक किलो चांदीचा दर 89415 रुपये होता. सोन्याच्या दरात वाढ होत असल्यानं गुंतवणूकदारांना अजून देखील सोन्यात गुंतवणुकीची संधी आहे.
Published at : 03 Jan 2025 03:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
बातम्या
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
