एक्स्प्लोर
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; सुख-संपत्तीत होणार अपार वाढ, नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून
Weekly Lucky Zodiacs 23 To 29 December 2024 : सुरू झालेला नवीन आठवडा अनेक राशींसाठी शुभ ठरणार आहे. या आठवड्यात मुख्यत्वे 5 राशींवर लक्ष्मीची कृपा राहील. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Weekly Lucky Zodiacs 23 To 29 December 2024
1/10

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope) : कुंभ राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा खूप शुभ राहील. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला करिअर आणि व्यवसायाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. या राशीच्या व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात भरपूर नफा मिळू शकतो.
2/10

तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते तुम्हाला परत मिळू शकतात. या आठवड्यात बाजारातील वाढीचा फायदा तुम्ही घेऊ शकाल. म्हणजेच गुंतवणुकीद्वारे तुम्हाला नफा मिळू शकतो, परंतु यासाठी तुम्ही अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रिय जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची चांगली संधी मिळेल.
3/10

तूळ रास (Libra Weekly Horoscope) : तूळ राशीच्या लोकांना या आठवड्यात थोडा विचार करावा लागेल. झटपट नफा मिळवण्याच्या प्रयत्नात तुम्हाला दीर्घकालीन नुकसान टाळावं लागेल. तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि विवेकाचा पुरेपूर वापर करावा लागेल.
4/10

तुम्हाला वाईट लोकांपासून योग्य अंतर राखावं लागेल, कारण काही लोक तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करण्याचा प्रयत्न करू शकतात. मात्र, या आठवड्यात तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. तुमचं मन धर्म आणि अध्यात्मात जास्त असेल. तुमचं प्रेम जीवन खूप आनंदी असेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल आणि त्यांच्यासोबत डिनर डेटवरही जाऊ शकता.
5/10

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope) : मिथुन राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा येणारा आठवडा शुभ आणि भाग्यशाली ठरणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुमची सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल. तुमच्या बचतीबाबत तुम्हाला अनेक दिवसांपासून ज्या समस्या येत होत्या त्या आता दूर होणार आहेत.
6/10

कामाच्या ठिकाणी तुम्हाला ज्या गोष्टींबद्दल खूप दिवसांपासून काळजी वाटत होती त्या सर्व आता दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून तसेच तुमच्या कनिष्ठांकडून कामाच्या ठिकाणी पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य मिळेल. तुमचा मान-सन्मान वाढेल. घरात आणि बाहेर तुमचा आदर वाढलेला दिसेल. तुमच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचं झालं तर, तुमच्या जोडीदाराशी तुमचा ताळमेळ चांगला राहील. तसेच विवाहित लोक देखील या आठवड्यात सुखी वैवाहिक जीवन जगतील.
7/10

कर्क रास (Cancer Weekly Horoscope) : डिसेंबरचा येणारा आठवडा कर्क राशीच्या लोकांसाठी लकी असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. या आठवड्यात तुम्हाला प्रमोशन देखील मिळू शकतं. या आठवड्यात तुम्हाला तुमचे सहकारी, जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल.
8/10

या आठवड्यात तुम्हाला अचानक काही आर्थिक लाभ होऊ शकतो. जमीन आणि इमारतींच्या खरेदी-विक्रीची इच्छा पूर्ण होईल. राजकारणाशी संबंधित लोकांचा समाज आणि पक्षात सन्मान वाढेल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल.
9/10

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope) : वृषभ राशीच्या लोकांसाठी येणारा आठवडा धनसंपत्ती बाबतीत फायदेशीर ठरेल. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला तुमच्या करिअर किंवा व्यवसायाच्या संदर्भात अचानक लांबच्या प्रवासाला जावं लागेल. तथापि, हा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर आणि यशस्वी ठरेल.
10/10

आगामी काळात तुम्ही केलेला प्रवास तुमच्यासाठी आनंददायी ठरेल. एवढंच नाही तर प्रवासादरम्यान प्रभावशाली लोकांशी तुमचे संबंध वाढतील. हे लोक तुमच्या करिअरला नवी दिशा देण्यासाठी उपयुक्त ठरतील. कुटुंबात आनंदाचं आणि हास्याचं वातावरण राहील. तुम्ही कुटुंबासोबत आनंदाने हसत वेळ घालवाल.
Published at : 24 Dec 2024 09:10 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बातम्या
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
