एक्स्प्लोर
नवरात्रीत 'या' 9 वस्तू खरेदी करणं ठरतं शुभ, माता दुर्गा देते सुख-समृद्धी अन् आर्थिक भरभराटीचा आशीर्वाद!
Sharadiy Navratri 2024: नवरात्रीच्या काळात माता दुर्गा आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी स्वर्गातून पृथ्वीवर येते. यावेळी भक्त मातेची पूजा करतात आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात.

Sharadiy Navratri 2024
1/12

नवरात्रीच्या काळात अनेक नियमांचं पालन करण्यासोबतच अनेक वस्तूंची खरेदी करणं देखील शुभ मानलं जातं, असं केल्यानं घरावर मातेची कृपादृष्टी कायम राहेत.
2/12

आज आम्ही तुम्हाला अशा 9 गोष्टी सांगणार आहोत, ज्या नवरात्रीच्या काळात खरेदी करणं तुमच्यासाठी खूप शुभ असेल. तुमच्यावर देवीचा आशीर्वाद कायम राहील.
3/12

प्रॉपर्टी : नवरात्रीच्या काळात नवं घर, जमीन किंवा दुकान यांसारखी नवी प्रॉपर्टी खरेदी करणं शुभ असतं.
4/12

धातूची मूर्ती : नवरात्रीच्या काळात तुमच्या आवडत्या देवतेची धातूची मूर्ती खरेदी करून मंदिरात स्थापन केल्यानं तुम्हाला त्यांचे अपार आशीर्वाद प्राप्त होतील. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार सोनं, चांदी किंवा पितळेची मूर्ती खरेदी करू शकता.
5/12

नवरात्रीचा काळ नव्या वाहन खरेदीसाठी अनुकूल आहे. यावेळी खरेदी केलेलं वाहन तुम्हाला दीर्घकाळ साथ देईल आणि ते लवकर खराब होण्याची शक्यता कमी असते.
6/12

नवरात्रीच्या काळात मेकअपच्या वस्तू खरेदी कराव्यात. असं केल्यानं तुमचं सौभाग्य वाढतं.
7/12

शुभ वनस्पती: हिंदू धर्मात शुभ मानल्या जाणाऱ्या वनस्पती जसं की, तुळस, वड, केळी नवरात्रीच्या काळात खरेदी करणं शुभ ठरतं. ही शुभं झाडं खरेदी करा आणि आपल्या घराच्या अंगणात लावा.यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.
8/12

गायीचं तूप : गायीला हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं, त्यामुळे यावेळी गाईचं तूप खरेदी करून दुर्गा देवीसमोर या तुपाचा दिवा लावा.
9/12

कपडे-दागिने : नवरात्रीच्या काळात नवे कपडे आणि दागिन्यांची खरेदी जरूर करा. हा उपाय तुमचं नशीब तुमच्या बाजूनं ठेवण्यास उपयुक्त ठरेल. हे तुमच्यासाठी शुभही ठरू शकतं.
10/12

ध्वज: नवरात्रीच्या काळात लाल रंगाचा ध्वज खरेदी करून मंदिरात ठेवावा. नवमीच्या दिवशी देवीच्या कोणत्याही मंदिरात हा ध्वज अर्पण करा. यामुळे तुमची प्रगती होईल.
11/12

एक लहान मातीचं घर विकत घ्या आणि ते मंदिरात ठेवा. नवरात्री दरम्यान खरेदी केलेलं मातीचे घर तुम्हाला तुमचं स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न लवकर पूर्ण करण्यात मदत करेल.
12/12

(टिप : वर सांगण्यात आलेल्या गोष्टी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत, यातून ABP माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 09 Oct 2024 09:01 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
