(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Stealth Omicron : धोका वाढताच! ओमायक्रॉन व्हेरियंटचा नवा स्ट्रेन 'स्टिल्थ ओमायक्रॉन', 'या' बाबी जाणून घ्या...
Stealth Omicron : कोरोनाव्हायरसचे ओमायक्रॉन प्रकार जगभरात वेगाने पसरत आहे. यात आता एक चिंताजनक बाब समोर आली आहे. ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी ओमायक्रॉनचा नवीन स्ट्रेन म्हणजे उपप्रकार आढळून आला आहे.
Stealth Omicron : कोरोनाव्हायरसचे ओमायक्रॉन (Omicron) प्रकार जगभरात वेगाने पसरत आहे. यात आता एक चिंताजनक बाब समोर आली आहे. ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी ओमायक्रॉनचा नवीन स्ट्रेन म्हणजे उपप्रकार आढळून आला आहे. हा स्ट्रेन, ज्याला ओमायक्रॉन BA.2 उपप्रकार किंवा 'स्टिल्थ ओमायक्रॉन' असे संबोधले जात असून त्याचा प्रसार 40 पेक्षा जास्त देशांमध्ये आढळून आला आहे. या उपप्रकाराची खास गोष्ट म्हणजे हा उपप्रकार RT-PCR चाचणीतही निसटू शकतो. स्टिल्थ ओमायक्रॉनने संपूर्ण युरोपमध्ये खळबळ माजवली आहे.
जागतिक आरोग्य संघटने (WHO) नुसार, ओमायक्रॉन प्रकारात तीन उपप्रकार (Strain) आहेत - BA.1, BA.2 आणि BA.3. जगभरात नोंदवलेल्या ओमायक्रॉन संसर्गांपैकी BA.1 उपप्रकार हा सर्वात प्रमुख असून, BA.2 उपप्रकार वेगाने पसरत आहे. डेन्मार्कमध्ये 20 जानेवारी रोजी सापडलेल्या ओमायक्रॉन रुग्णांमध्ये BA.2 उपप्रकाराचे सुमारे अर्ध्या संख्येची नोंद झाली. यूकेच्या आरोग्य अधिकार्यांनी BA.2 उपप्रकार ओमायक्रॉनचा सर्वात वेगाने पसरणारा उपप्रकार आहे.
यूके आणि डेन्मार्क व्यतिरिक्त, स्वीडन, नॉर्वे आणि भारतात BA.2 उपप्रकाराचे रुग्ण आढळून आले आहेत. भारत आणि फ्रान्सच्या शास्त्रज्ञांनी या उपप्रकाराबद्दल चेतावणी दिली आहे हा प्रकार BA.1 स्ट्रेनला मागे टाकण्याची भीती आहे. यूकेने 10 जानेवारीपर्यंत BA.2 उपप्रकाराचे 53 नमुने ओळखले होते.
ओमायक्रॉनचा उपप्रकार स्टिल्थ ओमायक्रॉन (BA.2) मूळ ओमाक्रॉनपेक्षा जास्त संसर्गजन्य असल्याचे म्हटले जाते. आतापर्यंत भारतासह डेन्मार्क, यूके, स्वीडन आणि सिंगापूरमध्ये स्टिल्थ ओमायक्रॉनचे सर्वाधिक नमुने सापडले आहेत. स्टिल्थ ओमायक्रॉन सर्व युरोपीय देशांमध्ये वेगाने पाय पसरवत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Omicron Variant : ओमायक्रॉन व्हेरिएंटचे 'हे' आहे लक्षण, चाचणीपूर्वीच संसर्ग झाल्याचे कळेल
- Omicron : चिंता वाढली! ओमायक्रॉन व्हेरियंटचा नवा उपप्रकार BA.2, भारतात सापडले 530 नमुने; किती धोकादायक?
- Olympic 2022 : बीजिंग ऑलिम्पिकपूर्वी 20 लाख लोकांची कोरोना चाचणी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )