Who is Ali Larijani: अवघं नेतृत्व संपलं, मृत्यू अवघा छाताडावर नाचत असतानाही अमेरिका- इस्रायलला 'कधीही न विसरता येण्यासारखा धडा' शिकवणारा पडद्यामागचा इराणी 'सेनापती'
Who is Ali Larijani: खामेनी आणि IRGC कमांडर मोहम्मद पाकपौर यांच्या हत्येनंतर अवघ्या 24 तासांतच त्यांनी अमेरिका आणि इस्रायलला 'कधीही न विसरता येण्यासारखा धडा' शिकवण्याचा निर्धार केला आहे.

Who is Ali Larijani: अणुकरार चर्चा सुरु असतानाच कोणत्याही सक्षम कारणांशिवाय इस्त्रायल आणि अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्यात अमेरिकेला मोठी किंमत चुकवावी लागली आहे. सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी (Ayatollah Ali Khamenei) यांच्यासह इराणचं नेतृत्व संपवूनही चार दिवसांपासून इराणने केलेला पलटवार ट्रम्प प्रशासनासह पेंटागाॅनला सुद्धा धडकी भरवणारा ठरला आहे. विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून इराणी लष्कराने अमेरिकेच्या तळांना लक्ष्य करत अवघी यंत्रणा उद्ध्वस्त करून टाकली आहे. यामध्ये इराणकडून सर्वाधिक 67 वर्षीय अली लारीजानी (Who is Ali Larijani ) चर्चेत आहेत. समोर मृत्यू दिसत असतानाही अली लारीजानी यांनी इस्त्रायल आणि अमेरिकेला हृदये जाळून टाकण्याचा इशारा देत पलटवार केल्याने नवा सेनापती चांगलाच चर्चेत आहे.
आक्रमक पवित्रा आणि अमेरिकेला इशारा
एरवी शांत आणि 'व्यवहार्य' मानले जाणारे 67 वर्षीय अली लारीजानी यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. खामेनी आणि IRGC कमांडर मोहम्मद पाकपौर यांच्या हत्येनंतर अवघ्या 24 तासांतच त्यांनी अमेरिका आणि इस्रायलला 'कधीही न विसरता येण्यासारखा धडा' शिकवण्याचा आणि त्यांच्या कृत्यांबद्दल 'त्यांची हृदये जाळून टाकण्याचा' (burn their hearts) थेट इशारा दिला आहे. खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणचा कारभार पाहणाऱ्या तीन सदस्यीय 'हंगामी परिषदेसोबत' (transitional council) लारीजानी आता देशाची सुरक्षा रणनीती ठरवण्यात एक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. लारीजानी यांनी जनतेला आश्वस्त केले आहे की घटनेनुसार नेतृत्वाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडली जाईल.
अमेरिकेशी वाटाघाटी करणार नाही
लारीजानी यांनी स्पष्ट केले आहे की इराण आता अमेरिकेशी कोणतीही वाटाघाटी करणार नाही. तसेच, त्यांनी इराणची रणनीती स्पष्ट करताना सांगितले की, आम्ही प्रादेशिक (आखाती) देशांवर हल्ला करणार नाही, पण अमेरिकेच्या लष्करी तळांना नक्कीच लक्ष्य करू. त्यांनी अमेरिका आणि इस्रायलला 'कधीही न अनुभवलेल्या ताकदीने' प्रत्युत्तर देण्याची शपथ घेतली आहे.
अफाट राजकीय प्रभावामुळे 'इराणचे केनेडी'
1958 मध्ये एका श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या लारीजानी यांच्या कुटुंबाला 'टाइम' मासिकाने त्यांच्या अफाट राजकीय प्रभावामुळे 'इराणचे केनेडी' (Kennedys of Iran) म्हटले होते. त्यांचे वडील एक प्रमुख धार्मिक अभ्यासक होते आणि त्यांचे भाऊदेखील इराणच्या न्यायव्यवस्थेत आणि सर्वोच्च नेत्याची निवड करणाऱ्या 'असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स'मध्ये उच्च पदांवर आहेत.
शैक्षणिक आणि राजकीय कारकीर्द
लारीजानी यांची शैक्षणिक पार्श्वभूमी आधुनिक आहे. त्यांनी गणित आणि कम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतली आहे, तर पाश्चात्य तत्त्वज्ञानावर (Western philosophy) पीएच. डी केली आहे. 1980 च्या दशकात त्यांनी 'IRGC' मध्ये काम केले. त्यानंतर ते सांस्कृतिक मंत्री आणि इराणच्या राज्य प्रसारकाचे (IRIB) प्रमुख होते. 2008 ते 2020 अशी सलग तीन वेळा ते इराणच्या संसदेचे (Majlis) अध्यक्ष होते आणि देशाचे धोरण ठरवण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली.
अध्यक्षपदाच्या निवडणुका आणि अपात्रता
लारीजानी यांनी 2005 मध्ये अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. त्यानंतर 2021 च्या निवडणुकीत इब्राहिम रईसी यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी 'गार्डियन कौन्सिल'ने त्यांना जाणीवपूर्वक अपात्र ठरवले होते. 2024 च्या निवडणुकीतही त्यांना पुन्हा अपात्र ठरवण्यात आले होते. मात्र, ऑगस्ट 2025 मध्ये राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी त्यांची पुन्हा 'सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे' सचिव म्हणून नियुक्ती केली.
अणू करार आणि वाटाघाटींना पूर्णविराम
2015 च्या ऐतिहासिक अणू कराराला (JCPOA) संसदेची मंजुरी मिळवून देण्यात लारीजानी यांनी मोठी भूमिका बजावली होती. अगदी अलीकडे, फेब्रुवारीत ओमानच्या मध्यस्थीने अमेरिकेशी अप्रत्यक्ष चर्चा करण्यातही ते सहभागी होते. मात्र, अमेरिका आणि इस्रायलच्या ताज्या हल्ल्यांमुळे हा 'मुत्सद्देगिरीचा मार्ग आता कायमचा बंद झाला आहे.
इराणने लक्ष्य केलेले आखाती देशांतील एअरबेस
- इराणने अमेरिकन सैन्य उपस्थिती असलेल्या जवळपास सर्वच प्रमुख आखाती देशांना लक्ष्य केले आहे.
- कुवेत: अली अल सालेम हवाई तळ (Ali Al Salem Air Base) आणि कॅम्प आरिफजान वर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा झाला. कुवेतमध्ये 4 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू
- बहरीन: मनामा येथील अमेरिकन नौदलाच्या पाचव्या ताफ्याचे (Fifth Fleet) मुख्यालय लक्ष्य करण्यात आले. दोन सॅटेलाइट कम्युनिकेशन टर्मिनल्स पूर्णपणे उद्ध्वस्त.
- कतार: अल-उदेद हवाई तळावर (Al-Udeid Air Base) इराणची क्षेपणास्त्रे पडली
- संयुक्त अरब अमिराती (UAE): जेबेल अली बंदर आणि दुबईतील काही भागांत ड्रोन हल्ले झाले. अमिरातीच्या हवाई संरक्षणाने 165 हून अधिक क्षेपणास्त्रे पाडल्याचा दावा केला असला तरी, बुर्ज अल अरब हॉटेल आणि विमानतळाजवळ नुकसान झाले आहे.
अमेरिकन दूतावासांवरील हल्ले
- इराणने केवळ लष्करी तळांनाच नव्हे, तर राजनैतिक कार्यालयांनाही लक्ष्य करून दबाव वाढवला आहे
- रियाध (सौदी अरेबिया): अमेरिकन दूतावासावर दोन ड्रोनद्वारे हल्ला. दूतावासा परिसरात आग लागली.
- कुवेत: कुवेतमधील अमेरिकन दूतावासावरही हल्ला झाल्याने अनिश्चित काळासाठी बंद
- दुबई: येथील अमेरिकन वाणिज्य दूतावासाजवळ ड्रोन हल्ला
- सुरक्षेच्या कारणास्तव लेबनॉन, सौदी आणि कुवैतमधील दूतावासांतून कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांना मायदेशी परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
किती मुस्लिम देशांवर हल्ले झाले?
इराणच्या प्रत्युत्तराच्या 'ऑनेस्ट प्रॉमिस ४' (Honest Promise 4) या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत किमान 8 मुस्लिम देशांच्या हद्दीत किंवा तळांवर परिणाम झाला आहे. यामध्ये बहरीन, जॉर्डन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया, सीरिया आणि संयुक्त अरब अमिरातीचा समावेश आहे. आखातातील अमेरिकेची दळणवळण यंत्रणा आणि हवाई तळांच्या पायाभूत सुविधांचे मोठं नुकसान झाले आहे.
इस्रायलच्या सापळ्यात ट्रम्प ट्रॅप?
विश्लेषकांच्या मते, अमेरिकेने खमेनेईंच्या हत्येत थेट सहभाग घेतल्यामुळे ती आता या युद्धाच्या गर्तेत पूर्णपणे अडकली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ही कारवाई 'न्याय' असल्याचे म्हटले असले तरी, या युद्धामुळे अमेरिकेला आखातातून बाहेर पडणे कठीण झाले आहे, ज्याचा फायदा इस्रायलला आपल्या प्रादेशिक शत्रूंना (इराण आणि प्रॉक्सी) संपवण्यासाठी होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या





















