(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Omicron Variant : ओमायक्रॉन व्हेरिएंटचे 'हे' आहे लक्षण, चाचणीपूर्वीच संसर्ग झाल्याचे कळेल
Omicron Variant : कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला आहे. भारतात कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकार सामुदायिक प्रसाराच्या टप्प्यात पोहोचला आहे.
Omicron Variant : कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला आहे. भारतात कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकार सामुदायिक प्रसाराच्या टप्प्यात पोहोचला आहे. या धोकादायक प्रकारामुळे भारतासह संपूर्ण जगात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची स्थिती कायम आहे. देशातील नवीन दैनंदिन रुग्णांच्या संख्येने तीन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. ओमायक्रॉनची लक्षणे सौम्य असल्याचे सांगितले जात आहे परंतु या विषाणूमध्ये वेगाने पसरण्याची पूर्ण क्षमता आहे. त्यामुळेच नवीन रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. ज्या वेगाने कोरोनाचे नवीन प्रकार समोर येत आहेत, त्याच वेगाने त्याची लक्षणेही बदलत आहेत. या प्रकाराची अनेक लक्षणे आहेत, जी सामान्य कोरोनारुग्णांच्या लक्षणांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत.
सर्वात गंभीर गोष्ट अशी आहे की ओमायक्रॉनची लक्षणे सामान्य सर्दी किंवा फ्लू सारखीच आहेत, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला कोरोना आहे की सामान्य सर्दी-फ्लूचा त्रास यात भेद करणे कठीण जाते. मात्र, तज्ज्ञांनी सल्ला देत काही लक्षणे सांगितली आहेत, जी ताबडतोब तपासली पाहिजेत त्यामुळे विषाणू लवकर ओळखता येईल आणि त्याला प्रतिबंध करण्यास मदत होईल.
कोरोना शोधण्यासाठी चाचणी करणे आवश्यक आहे. मात्र, काही लक्षणे आहेत ज्याद्वारे सहज ओळखले जाऊ शकते की ही कोरोनाचीच लक्षणे आहेत. अलीकडे, एका अमेरिकन डॉक्टरने ओमायक्रॉन विषाणूचे प्रारंभिक सूचक म्हणून एका विशिष्ट लक्षणाबाबत सांगितले आहे. शिकागोच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त एलिसन अरवाडी यांनी नुकतेच सांगितले की, एखाद्याला कोरोना आहे हे घसा खवखवल्यावरून कळू शकते.
NBC शिकागोने दिलेल्या वृत्तानुसार, डॉक्टरांनी सांगितले आहे की, तुम्हाला घसा खवखवणे, कारण काहीही असो, तर तुम्ही समजावे की तो कोरोना आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या घरीच राहून ताबडतोब तपासणी करून घ्यावी. हे देखील लक्षात घ्या की घसा खवखवणे हे विषाणूचे एकमेव लक्षण नाही आणि काही लोक या लक्षणाने अजिबात प्रभावित होणार नाहीत. याची पुष्टी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे चाचणी करणे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Coronavirus Cases Today : सलग तिसऱ्या दिवशी देशात कोरोनारुग्णांमध्ये घट, गेल्या 24 तासांत 3 लाख 6 हजार 64 नवीन कोरोनाबाधित
- Republic Day Parade Guidelines : 15 वर्षांखालील मुलांना लसीकरणाशिवाय परेडमध्ये परवानगी नाही, प्रजासत्ताक दिनासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे
- Olympic 2022 : बीजिंग ऑलिम्पिकपूर्वी 20 लाख लोकांची कोरोना चाचणी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )