(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Olympic 2022 : बीजिंग ऑलिम्पिकपूर्वी 20 लाख लोकांची कोरोना चाचणी
Olympic 2022 : कोरोना महामारीच्या काळात जगातील अनेक देश निर्बंधांमध्ये शिथिलता देत आहेत, मात्र चीनमध्ये शून्य कोविड धोरणाचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.
Olympic 2022 : कोरोना (Corona) महामारीने जगभरात थैमान घातले आहे. दरम्यान, चीनमध्ये (China) कोरोना संसर्गाबाबत शून्य कोविड धोरण (Zero Covid Policy) सुरू आहे. बीजिंग ऑलिम्पिक (Beijing Winter Olympics) पूर्वी चीन सरकारने कोरोनाबाबत दक्षता वाढवली आहे. बीजिंगमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे समोर आल्यानंतर सुमारे 20 लाख लोकांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की, कोरोना संसर्गाने बाधित लहान क्लस्टर्सची ओळख पटल्यानंतर सर्व 20 लाख रहिवाशांची कोरोना चाचणी केली जाईल.
बीजिंग ऑलिम्पिकबाबत चीन सावध (Beijing Winter Olympics 2022)
हिवाळी ऑलिम्पिक सुरू होण्यास आता काही दिवस उरले आहेत. चीनमध्ये, कर्मचार्यांना पोस्टल सर्विस मेलद्वारे कोरोना पसरवण्याच्या भीतीने आंतरराष्ट्रीय वितरण निर्जंतुक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी दावा केला होता की पोस्टल सर्विस मेल हे कोरोना विषाणू पसरवण्याचे स्त्रोत असू शकतात.
जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांपैकी एक असलेल्या बीजिंगमध्ये गेल्या एका आठवड्यात सुमारे 30 कोरोना संसर्गाची प्रकरणे समोर आली आहेत. चीनमधील कोरोना रुग्ण जगभरातील देशांमधील मोठ्या तेजीचा एक छोटासा भाग आहे. ओमायक्रॉन प्रकारांच्या संसर्गाची प्रकरणेही येथे आढळून आले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Coronavirus Cases Today : सलग तिसऱ्या दिवशी देशात कोरोनारुग्णांमध्ये घट, गेल्या 24 तासांत 3 लाख 6 हजार 64 नवीन कोरोनाबाधित
- आजपासून शाळेत पुन्हा किलबिलाट, राज्यात शाळा कुठे सुरु, कुठे बंद; वाचा सविस्तर
- PM Modi : पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी साधणार संवाद, देशभरातील 29 बालकांचा सन्मान
- Cold Weather : मुंबईत कालची रात्र सर्वाधिक थंडीची, तापमान 16 अंशांवर; राज्यात 3 ते 4 दिवस गारठा कायम राहणार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha