एक्स्प्लोर
Advertisement
कुलभूषण जाधव प्रकरणी आयसीजेमध्ये भारताकडून पाकिस्तानच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश
भारताकडून वकील दीपक मित्तल आणि वरिष्ठ वकील हरिश साळवे यांनी बाजू मांडत पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांचा पर्दाफाश केला.
द हेग : कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात झालेल्या सुनावणीत भारताने व्हिएन्ना करारावरुन पाकिस्तानला घेरलं आहे. भारताकडून वकील दीपक मित्तल आणि वरिष्ठ वकील हरिश साळवे यांनी बाजू मांडत पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांचा पर्दाफाश केला. पाकिस्तानने व्हिएन्न कराराचं उल्लंघन केलं आणि 13 वेळा विनंती करुनही कुलभूषण जाधव यांना कौन्सलर अॅक्सेस दिला नाही, असं हरिश साळवे म्हणाले. तसंत कुलभूषण जाधव निर्दोष असून पाकिस्तान त्यांना अडकवून आपला छुपा अजेंडा रेटू पाहत आहे, असा आरोपही दोन्ही वकिलांनी केला.
आंतरराष्ट्रीय न्यायालयात सर्वात आधी दीपक मित्तल हजर झाले. आयसीजेच्या मागील निर्णयामुळे सव्वाशे कोटी भारतीयांच्या मनात अपेक्षा निर्माण झाली होती. पाकिस्तानने एका निर्दोष भारतीय नागरिकाच्या अधिकारांची गळचेपी करुन आंतरराष्ट्रीय न्यायलयाच्या आदेशाचं योग्यरित्या पालन केलं नाही, असं दीपक मित्तल म्हणाले.
दीपक मित्तल यांच्यानंतर हरिश साळवे हे कुलभूषण जाधव यांच्यावतीने हजर झाले. साळवे यांनी आपल्या युक्तिवादाची सुरुवात व्हिएन्ना कराराने केली. "पाकिस्तानने या कराराचं पालन केलं नाही. व्हिएना कराराच्या आर्टिकल 36 अंतर्गत पाकिस्तान कुलभूषण जाधव यांना कौन्सलर अॅक्सेस देत नाही," असं साळवे म्हणाले.
कुलभूषण जाधव निर्दोष भारतीय असल्याचं सांगत हरिश साळवे म्हणाले की, "पाकिस्तान मध्येच अशा गोष्टी उपस्थित करतात, ज्याचा प्रत्यक्षात काहीही अर्थ नाही." "भारताविरोधात सुरु असलेल्या छुप्या अजेंड्यासाठी पाकिस्तान जागतिक व्यासपीठाचा वापर करत आहे," असा आरोपही साळवे यांनी केला. तसंच पाकिस्तानच्या सैनिक न्यायालयाने केलेल्या कारवाईवरही भारताने आक्षेप नोंदवला आहे.
कुलभूषण जाधवांच्या कथित कबुलनाम्याच्या व्हिडिओत 102 कट्स
काय आहे प्रकरण?
भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना कथित हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानच्या न्यायालयाने एप्रिल 2017 रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र याप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताने दाद मागितल्यावर 18 मे 2017 रोजी कूलभूषण यांच्या फाशीवर स्थगिती आली.
कोण आहेत कुलभूषण जाधव?
'रॉ'चे हेर असल्याचा आरोप करत कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान प्रांतातून 3 मार्च 2016 मध्ये अटक झाली होती.
जाधव कुटुंबीय मूळचे सांगलीतील असून, सध्या मुंबईत वास्तव्यास आहे.
कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत.
जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव कुटुंबीयाने फेटाळून लावला आहे.
'माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो,' असं त्यांचे वडील म्हणाले होते.
संबंधित बातम्या :
स्पेशल रिपोर्ट : पाकिस्तानने 'असं' अडकवलं कुलभूषण जाधवांना
पाकिस्तानचा कुलभूषण यांच्यावर दहशतवाद पसरवल्याचा आरोप
आईवर भारतीय अधिकारी ओरडले, कुलभूषण जाधवांचा कथित व्हिडिओ
जाधव कुटुंबीयांना अपमानित करणं हे आधीच ठरलं होतं?
‘पाकिस्तान मुर्दाबाद’... कुलभूषण प्रकरणी शिवसेनेचा संसदेत एल्गार
पाक मीडियाने लायकी दाखवली, कुलभूषण कुटुंबीयांना अपमानास्पद प्रश्न
टिकली-बांगड्या उतरवल्या, मराठीतही बोलू दिलं नाही
कुलभूषण यांच्या आई, पत्नी भारतात, सुषमा स्वराज यांच्याशी भेट
कान, डोक्यावर जखमांचे निशाण, पाकिस्तानकडून जाधवांचा छळ?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement