Disha Salian : दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात, नितेश राणेंचा आरोप; मुनगंटीवर म्हणाले, विधानभवनात चर्चा होऊ शकते
Disha Salian Death Case : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिशा सालियन प्रकरणात पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केला असा आरोप भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी केला.

मुंबई : दिशा सालियनची हत्या झाली होती आणि तिच्या वडिलांन आज जी नावं घेतली ती पहिल्या दिवसांपासून सांगत होतो, त्यामध्ये आदित्य ठाकरेंचा हात आहे असा आरोप भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी केला. तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी काय काय केलं होतं हे दिशाच्या वडिलांनी याचिकेतून सांगितलं आहे. त्यावेळी आमच्यावर खोटेपणाचा आरोप करणारे आता काय करणार असा प्रश्नही नितेश राणे यांनी केला. तर दुसरीकडे या प्रकरणी विधानभवनात चर्चा होऊ शकते असं भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवर यांनी म्हटलं आहे.
दिशा सालियानवर सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली असं सांगत तिच्या वडिलांनी नव्याने याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुन्हा तपास व्हावा अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणात नितेश राणे आणि अर्णब गोस्वामी यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे असं दिशाच्या वडिलांनी म्हटलं आहे.
विधानसभवनात चर्चा होऊ शकते: मुनगंटीवार
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "दिशा सालियन प्रकरणात माझ्याकडे कोणताही पुरावा नाही. पण तिच्या वडिलांनी जर दबाव असल्याची तक्रार केली असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. या विषयावर उद्या विधानभवनात चर्चा होऊ शकते. ठ
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "दिशा सालियन प्रकरणात जर नितेश राणे किंवा आणखी कुणाकडे पुरावे असतील तर त्यांनी ते तपास यंत्रणाना दिले पाहिजे. असे कुणाकडे पुरावे असतील तर त्यांनी ते पोलिसांना देऊन मदत कारण गरजेचं आहे."
या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांनी आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप सतीश सालियान यांनी केला आहे. त्यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की,
किशोरी पेडणेकरांनाचा दबाव होता का नाही हे त्याच सांगतील.
दुसरीकडे शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनीही दिशा सालियान प्रकरणावर आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या की, दिशा सालियान मृत्यूच्या पाच वर्षानंतर तिच्या वडिलांनी न्यायालयात धाव घेतली आहे. महाविकास आघाडी सरकार त्या वेळी असताना त्यांच्यावर दबाव होता. महायुतीचं सरकार आल्यानंतर न्याय मिळेल या हेतून त्यानी या प्रकरणाची पुन्हा चौकशीची मागणी केली आहे.
ही बातमी वाचा






















