Trending News : अंड्यातून बाहेर पडताच सापाचा केअरटेकरवरच हल्ला, थरकाप उडवणारा व्हिडीओ पाहाच
Viral Video : सध्या सोशल मीडियावर सापांच्या पिल्लांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये अंड्यातून बाहेर पडलेली सापांची पिल्लं केअरटेकरवर हल्ला करताना दिसत आहेत.
Trending Video : सापचा समावेश सर्वात धोकादायक प्राण्यांमध्ये होतो. साप पाहून भल्याभल्यांचा थरकाप उडतो. मग साप चावला तर तुमची काय अवस्था होईल हे तर सांगायलाच नको. असाच एक सापाचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.
सोशल मीडियावर दररोज भन्नाट, नवनवीन व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. काही वेळेस अनेक धक्कादायक आणि रोमांचक व्हिडीओही व्हायरल होतात. सध्या सापाच्या पिल्लांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सापाला समोर पाहिल्यावर भल्याभल्यांना घाम फुटतो. साप समोर दिसला तर अगदी थरकाप उडतो. मात्र काही लोक असे आहेत, जे सापही अतर पाळीव प्राण्यांप्रमाणे पाळतात. सध्या असाच एक पाळीव सापांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती एका मोठ्या प्लास्टिकच्या भांड्यात सापांच्या अंड्यांची काळजी घेताना दिसत आहे. यावेळी अंड्यातून बाहेर आलेली काही सापाची पिल्लं फार खूपच गोंडस दिसत आहेत. पण ही गोंडस दिसणारी सापाची पिल्लं अंड्यातून बाहेर येताच त्यांना पाळणाऱ्या त्यांच्या केअरटेकरवरच हल्ला करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून कोणालाही नक्कीच भीती वाटेल.
View this post on Instagram
व्हायरल व्हिडीओमध्ये सापाची पिल्लं केअरटेकरच्या हातावर एकामागून एक हल्ला करताना दिसत आहे. ही व्यक्ती त्यांची केअरटेकर आहे. सापाच्या मुलांचा हल्ला होऊनही त्या व्यक्तीला काहीही होत नाही, असे या व्हिडीओमध्ये दिसून येते. व्हिडीओमध्ये दिसणारी सापाची पिल्लं विषारी आहेत की नाही याबाबत सध्या कोणतीही माहिती मिळालेली नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :