एक्स्प्लोर
Prisoner:तुरुंगातून पळून जाणाऱ्या कैद्याची शिक्षा वाढते का?
जर एखाद्या व्यक्तीने अपराध केला तर त्याला कायद्यानुसार शिक्षा केली जाते पण एखादा कैदी त्याची शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच तुरुंगातून पळून गेला तर त्याला किती शिक्षा होते हे जाणून घेऊयात.
Prisoner(Pic credit:unplash)
1/10

जर एखादा कैदी तुरुंगातून पळून गेला किंवा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला तर त्याला भारतीय दंड संहितेच्या कलम 226 नुसार शिक्षा केली जाते. 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा तो भोगत असलेली शीक्षा आणि तुरुंगातून पळून जाण्याची शिक्षा दोन्ही भोगावी लागतात.
2/10

तर, भारतीय दंड संहितेनुसार, सर्वात आधी कैद्याला तुरुंगातून पळून जाण्याच्या गुन्ह्याखाली 224 कलामानुसार शिक्षा दिली जाते.
3/10

भारतीय दंड संहितेनुसार जर एखाद्या व्यक्तीने कैद्याला पळवण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कलम 222, 225 च्या अंतर्गत कारवाई करण्यात येते. आता या कलमात बदल करण्यात आला आहे.
4/10

जर एखाद्या कैद्याला पळून गेल्यानंतर पकडलं तर त्याला परत तुरुंगात पाठवलं जातं आणि पळून जाण्यासाठी घालवलेला वेळ त्याच्या शिक्षेत जोडला जात नाही;तुरुंगातून पळून जाण्याचा हा गुन्हा त्याच्या पहिल्या शिक्षेत जोडला जातो .
5/10

कधीकधी अशा कैद्यांना दुसऱ्या तुरुंगात पाठवलं जातं आणि , कैदी कसा पळून गेला, पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे किंवा कोणाच्या मदतीने गेला , याचा तपास केला जातो.
6/10

तुरुंगातून पळून गेल्यामुळे , कैद्याला जामीन मिळणं अशक्य असतं. कारण आधीच सुरू असलेल्या शिक्षेदरम्यान पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवला जात नाही.
7/10

जर कैद्याने पळून जाताना हिंसाचार, चोरी किंवा हल्ला केला असेल तर त्यासाठीही त्याला वेगळी शिक्षा दिली जाते.
8/10

भारतीय न्यायिक संहितेनुसार, जर तुरुंगातील कोणत्याही कर्मचाऱ्याने कैद्याला पळून जायला मदत केली तर त्यासाठीही कडक तरतुदी आहेत.
9/10

कलम 156 अंतर्गत, जर एखाद्या तुरुंगाधिकारी किंवा पोलिस अधिकाऱ्याने जाणूनबुजून एखाद्या राज्यातील कैद्याला पळून जाण्यास मदत केली तर त्याला जन्मठेपेची शिक्षा किंवा 10 वर्षांची शिक्षा आणि दंड होऊ शकतो.
10/10

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 11 Oct 2025 12:49 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
ठाणे
क्रिकेट























