Viral : केक आर्टिस्टने बनवला 'सेल्फी केक', तुम्ही पाहिलाय का?
Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक केक व्हायरल होत आहे. केक आर्टिस्टने बनवला हुबेहुब स्वत: सारखा दिसणारा केक बनवला आहे. तुम्हीही व्हिडीओ नक्की पाहा.
Trending News : सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होताना पाहायला मिळतात. अनेकदा काही भन्नाट व्हिडीओ नेटकऱ्यांचं खास लक्ष वेधून घेताना दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. त्याच कारण एक केक आर्टिस्ट आहे. या केक आर्टिस्टने बनवलेला केक पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. नेटकऱ्यांनीही या व्हिडीओला चांगला पसंतीस उतरला आहे.
सध्या नतालिया साईडसर्फ नावाची केक आर्टिस्ट विशेष चर्चेत आहे. तिने बनवलेले केक सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. यामागचं कारण म्हणजे तिचं कौशल्य आहे. नतालियाने तिने बनवलेले सुंदर केक इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिचं कौशल्य पाहून नेटकरी चांगलेच भारावले आहेत. तिने हुबेहुब तिच्या सारखाच दिसणारा केक बनवला आहे.
नतालियाने शेअर केलेला केकचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. नतालियाने केक आणि क्रिमचा वापर करून स्वत:ची हुबेहुब प्रतिकृती साकारली आहे. हा केक पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही की यामधील खरी नतालिया कोणती आहे आणि केक कोणता. नतालियाने या सेल्फी केकमध्ये हुबेहुब स्वत: सारखा दिसणारा केक बनवला आहे.
View this post on Instagram
नतालियाने हा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. हा व्हिडीओला आतापर्यंत 8.2 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. सुमारे 6 लाख लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. नतालियाचा हा सेल्फी केक नेटकऱ्यांनी खूप आवडला आहे. अनेकांनी स्वत:च्या वाढदिवसाला सेल्फी केकची ऑर्डर देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Trending : 12 नातवंड, 21 पतवंड असलेल्या आजी-आजोबांचा लग्नाचा वाढदिवस; 70 वर्ष जुन्या लग्नातील कपड्यांमध्ये खास फोटोशूट
- Viral Video : धक्कादायक! महिलेला जमिनीवर लोळवून केली कोविड टेस्ट, व्हिडीओ व्हायरल
- Viral Video : नवरदेवासमोरच मित्राने चोरले पैसे, वराच्या नकळत घडला प्रकार, तुम्ही व्हिडीओ पाहिला का?
- Viral Video : 'या' आजी-आजोबांचा डान्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क, पाहा भन्नाट व्हिडीओ