Ramdas Athawale : 'धनुष्यबाण' शिंदे गटालाच मिळेल, कारण....वाचा नेमकं काय म्हणाले रामदास आठवले?
धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटालाच (Shinde Group) मिळेल, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Minister Ramdas Athawale) यांनी व्यक्त केला.
![Ramdas Athawale : 'धनुष्यबाण' शिंदे गटालाच मिळेल, कारण....वाचा नेमकं काय म्हणाले रामदास आठवले? Minister Ramdas Athawale Comment on Shiv Sena Symbol Issue Election Commission Ramdas Athawale : 'धनुष्यबाण' शिंदे गटालाच मिळेल, कारण....वाचा नेमकं काय म्हणाले रामदास आठवले?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/21/d9552bb6264dea669fdc84bce20bb5f11674264337771339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ramdas Athawale : धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटालाच (Shinde Group) मिळेल, असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Minister Ramdas Athawale) यांनी व्यक्त केला आहे. उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) एका कार्यक्रमासाठी आठवले आले होते, त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे 40 आमदार आणि 13 खासदार आहेत. त्यामुळं धनुष्यबाण हे चिन्ह त्यांनाच मिळेल असे आठवले म्हणाले. यावेळी आठवलेंनी खासदार संजय राऊतांनाही टोला लगावला.
Ramdas Athawale on Sanjay Raut : संजय राऊत यांनी आणखी 20-25 वर्ष विरोधी पक्षातच रहावं
केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Election Commission of India) शुक्रवारी (20 जानेवारी) शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यावतीने युक्तिवाद करण्यात आला. यावेळी सोमवारी दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. याबाबत रामदास आठवले यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला, त्यावेळी त्यांनी शिंदे गटालाच धनुष्यबाण मिळेल असं वक्तव्य केलं. यावेळी आठवलेंनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. संजय राऊत यांनी आणखी 20-25 वर्ष विरोधी पक्षातच रहावं, असा टोला रामदास आठवले यांनी लगावला.
Shiv Sena Symbol Issue Election Commission : कालच्या सुनावणीत नेमकं काय झालं?
शिवसेना आणि धनुष्यबाणावरील केंद्रीय निवडणूक आयोगात सुरु असलेली सुनावणी पुढे ढकलली आहे. निवडणूक आयोगात काल शिवसेना आणि धनुष्यबाण नेमका कुणाचा? याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. सोमवारी 23 जानेवारीपासून 30 जानेवारीपर्यंत रोजी दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. लेखी उत्तरं मिळाल्यानंतर आयोग पुढील कार्यवाही करणार आहे. काल ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल, देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला तर शिंदे गटाच्या वतीने महेश जेठमलानी, मनिंदर सिंह यांनी युक्तीवाद केला. जवळपास चार तास चाललेल्या या सुनावणीनंतरही शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरेंना (Uddhav Thackeray) मिळणार की शिंदेंना मिळणार? महाराष्ट्राला पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर काल देखील मिळालं नाही. कालच्या सुनावणीत ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये शाब्दिक चकमक झाली. ठाकरे गटाचे देवदत्त कामत आणि शिंदे गटाचे महेश जेठमलानी यांच्यात शाब्दिक चकमक झाल्यानंतर आयोगाला मध्यस्थी करावी लागली.
महत्त्वाच्या बातम्या:
Shiv Sena Thackeray vs shinde : धनुष्यबाण कुणाचा? आजही निर्णय नाहीच; सुनावणी संपली, सोमवारी दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश, 30 तारखेला सुनावणी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)