एक्स्प्लोर

Nashik Crime : बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; नाशिकच्या मालती IVF सेंटरच्या संचालकाला अटक, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा उलगडा होणार?

Badlapur Uterine Eggs Selling Racket : राज्याला हादरवून सोडणाऱ्या बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात (Badlapur Uterine Eggs Selling Racket) पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

Badlapur Uterine Eggs Selling Racket नाशिक : राज्याला हादरवून सोडणाऱ्या बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात (Badlapur Uterine Eggs Selling Racket) पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस तपासा बदलापूर स्त्री बीज प्रकरणाचे नाशिक (Nashik Crime) कनेक्शन उघडकीस आलं होतं. या प्रकरणी आता नाशिकमधील मालती आयव्हीएफ (IVF) सेंटरचा संचालक डॉ. अमोल पाटीलला बदलापूर पोलिसांनी काल (3 मार्च) रात्री उशिरा अटक केलीय. दरम्यान, आज डॉ. अमोल पाटीलला कल्याण सेशन कोर्टात हजर करण्यात येणार आहे. डॉ. अमोल पाटीलवर सरोगेट मदर एजंट म्हणून काम केल्याचा आरोप आहे. त्यामुळे आज न्यायालयात नेमकं काय निर्णय होतो हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

Nashik Crime News : नाशिक महापालिकेने बजावली नोटीस; मालती IVF सेंटरच्या कागदपत्रची होणार तपासणी

दुसरीकडे, बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणाची व्याप्ती वाढत असताना या प्रकरणा आंतरराष्ट्रीय स्त्रीबीज तस्करीचा रॅकेट असल्याचाही पोलिसांना संशय आहे. शिवाय हे रॅकेट बदलापूर येथून चालत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाल्याची चर्चा आहे. तर आयव्हीएफ सेंटरच्या नावाखाली हा व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणी संशयित एजेंटचीही चौकशी सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणाचे अजून काही सूत्रधार समोर येण्याची दाट शक्यता आहे. अशातच अमोल पाटीलला नाशिक महापालिकाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता मालती आयव्हीएफ सेंटरच्या कागदपत्रची तपासणी होणार असल्याची माहिती आहे.

नेमकं प्रकरण काय? (Badlapur Uterine Eggs Selling Racket)

बदलापूरात स्त्री बीजाच्या अवैध विक्रीचं रॅकेट उघड झालं आहे. याप्रकारचं हे भीषण रॅकेट चक्क एका घरातून चालवलं जात होतं. सुलक्षणा गाडेकर या महिलेनं घरामध्ये स्त्री बीज वाढवणारी इंजेक्शन्स बेकायदेशीरपणे साठवून ठेवली होती, असा आरोप आहे. गरजू महिलांना पैशांचं आमिष दाखवून हे इंजेक्शन दिलं जात होतं. त्यानंतर गर्भाशयात स्त्री बीजांची वाढ झाल्यावर संबंधित महिलांना IVF सेंटरमध्ये पाठवलं जात होतं. तिथल्या डॉक्टरांकडून ऑपरेशन थिएटरमध्ये स्त्री बीज काढून त्यांची बेकायदेशीर विक्री केली जात होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. बदलापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना सावंत यांच्या पथकानं सुलक्षणा गाडेकर यांच्या घरी धाड टाकून हे रॅकेट उघडकीस आणलं. या प्रकरणी गाडेकर यांच्यासह अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे एक मोठं इंटरनॅशनल रॅकेट असण्याची शक्यता आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Pune Crime News: पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Palghar Accident News: पालघरमध्ये भीषण अपघात, मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू, पोलिसांच्या भीतीने पळताना अपघात? नातेवाईकांचा गंभीर आरोप
पालघरमध्ये भीषण अपघात, मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू, पोलिसांच्या भीतीने पळताना अपघात? नातेवाईकांचा गंभीर आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: आखाती देशातील युद्धाचा फटका शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याला; दरात 35 ते 40 टक्के वाढ
आखाती देशातील युद्धाचा फटका शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याला; दरात 35 ते 40 टक्के वाढ
Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
Embed widget