एक्स्प्लोर

माढ्यात बैलगाडा शर्यतीचा थरार, राज्यभरातून बैलगाडा चालक दाखल, अभिजीत पाटलांचं शक्तीप्रदर्शन

माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी बावीत आज भव्य बैलगाडा शर्यतीचं (Bullock cart race) आयोजन केलं आहे.

Bullock cart race in Madha : विधानसभा निवडणुकीच्या (vidhansabha election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापालया सुरुवात झाली आहे. निवडणुकांच्या आधीच वातावरण निर्मितीसाठी इच्छुक उमेदवरा विविध स्पर्धांच आयोजन करत आहेत. माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी बावीत आज भव्य बैलगाडा शर्यतीचं (Bullock cart race) आयोजन केलं आहे. बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून अभिजीत पाटील यांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलं आहे.  

शर्यतीसाठी राज्यभरातून बैलगाडा चालक दाखल

अभिजीत पाटील यांनी अलिकडच्या काळात माढ्यात वेगवेगळ्या स्पर्धांचा धडाका लावला आहे.आज बावी येथे ओपन बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीसाठी राज्यभरातून बैलगाडा चालक आले आहेत. या स्पर्धेसाठी भरघोस बक्षिसांची खैरात केली जात आहे. या स्पर्धा पाहण्यासाठी माढा पंचक्रोशीतून हजारोंच्या संख्येने रसिक बावी येथे पोहोचले आहेत. सकाळी 11 वाजल्यापासून या ओपन बैलगाडा शर्यतीला  सुरुवात झाली आहे.

अभिजीत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून इच्छुक

अभिजीत पाटील यांनी माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून ते इच्छुक आहेत. मात्र, त्यांना तिकीट मिळेल का नाही? याबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. बबनदादा शिंदे यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर 'धपका पॅटर्न' म्हणून ओळख असणाऱ्या पंढरपूरच्या अभिजीत पाटलांनी शरद पवार यांच्याशी जवळीक साधली. ऊसाला जिल्ह्यात विक्रमी दर देणारे अभिजीत पाटील कमी काळात प्रसिद्धीच्या झोतात आलेत. त्यांनी माढा मतदासंघात खेळ पैठणीचा, माढा केसरी कुस्ती स्पर्धा, दही हंडीचा कार्यक्रम या माध्यमातून वातावरण निर्मिती करायला सुरुवात केलीय. सध्या माढा मतदारसंघातील गावोगावी त्यांचे दौरे सुरु आहेत. 

दरम्यान, एकेकाळी शरद पवारांनी संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी अभिजीत पाटील यांच्या खांद्यावर टाकली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीवेळी अभिजीत पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पंढरपुरात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर एक कार्यक्रम देखील घेतला. त्यानंतर अभिजीर पाटील यांच्या साखर कारखान्याला मदत देखील मिळाल्याचं आपण पाहिलं. मात्र, त्यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाण्याचा निर्णय जनतेला काही पटला नाही. त्यामुळं आता शरद पवार त्यांनी विधानसभेला तिकीट देणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. 

महत्वाच्या बातम्या:

ऊस दराची स्पर्धा ठरवणार माढा विधानसभेचा आमदार?  दिग्गज साखर कारखानदार आमने-सामने, काय आहेत समीकरणं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अवैध वाळू उपसा प्रकरण! कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर प्राणघातक हल्ला, आरोपीच्या अटकेसाठी बेमुदत आंदोलन सुरु
अवैध वाळू उपसा प्रकरण! कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर प्राणघातक हल्ला, आरोपीच्या अटकेसाठी बेमुदत आंदोलन सुरु
Pandharpur Viral Video : पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
Manoj Jarange Patil : मला रोज धमक्या, कधी कोण येऊन घात करून मला संपवतील; मनोज जरांगे पाटलांचा खबळजनक आरोप, वर्षभर दौरे थांबवणार
मला रोज धमक्या, कधी कोण येऊन घात करून मला संपवतील; मनोज जरांगे पाटलांचा खबळजनक आरोप, वर्षभर दौरे थांबवणार

व्हिडीओ

Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष
Sanjay Raut Mumbai PC : गणित जमत नसल्यानं प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेपासून दूर - संजय राऊत
Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Sachin Ahir : राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
राज्यसभेसाठी ठाकरेसेनेचा दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला आदित्य ठाकरेंची दांडी का? सचिन अहिर म्हणाले...
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
'अमेरिकेनं क्रूर कृत्य करत बुडवलेली 'फ्रीगेट देना' युद्धनौका इंडियन नेव्हीची गेस्ट होती, माझे शब्द लिहून ठेवा, त्यांनी जो पायंडा मांडला आहे ते पाहता..' इराणचा गर्भित इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
अजित पवारांचा अपघात नव्हे घातपातच असल्याचा संशय, सुनेत्रा पवारांसह पार्थ-जय पवार घेणार पंतप्रधान मोदींची भेट
Gold Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरवाढीला ब्रेक, सोनं 2698 तर चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर 
सोने चांदीच्या दरवाढीला अखेर ब्रेक, चांदी 13547 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Embed widget