Satara Crime News: पतीशी भांडण अन् माहेरी वास्तव्य, घराशेजारील व्यक्तीशी ओळख नंतर प्रेमसंबधातून महिलेवर कोयत्याने जीवघेणा हल्ला, जबडाच फाडला त्यानंतर...
Satara Crime News: हल्ला केल्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला आहे, त्याला शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना केली आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

कराड : प्रेमसंबधातून एका महिलेवर तरूणाने कोयत्याने वार करत जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आगाशिवनगर (मलकापूर) ता. कराड येथील दांगट वस्ती येथे प्रेमसंबधातून एकाने 30 वर्षीय महिलेवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेवर कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. महिलेवर झालेल्या गंभीर हल्ल्यात जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे तिची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी महिलेच्या वडिलांनी कराड शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. रविंद्र सुभाष पवार (वय 35) रा. दांगट वस्ती, आगाशिवनगर (मलकापूर) असे हल्ला केलेल्याचे नाव आहे. हल्ला केल्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला आहे, त्याला शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना केली आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला झालेली संबधित महिला ही विवाहित असून नवऱ्याला सोडून ती दांगट वस्ती येथे आई-वडिलांकडे वास्तव्यास आहे. महिलेला तीन मुले आहेत. जवळच राहणाऱ्या हल्लेखोर रविंद्र याच्याशी तिची पूर्वीची ओळख असून तिचे हळूहळू ओळखीतून त्याच्याशी प्रेमसंबधही निर्माण झाले. गुरुवारी दुपारी रविंद्र तिच्या घरी गेला होता. त्यांच्यात काहीतरी बोलणं झालं. त्यावेळी वाद झाले आणि त्यानंतर रविंद्रने तिच्यावर थेट कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या कानापासून जबड्यापर्यंत वार गेल्याने तिचा जबडा पूर्णपणे फाटला आणि ती गंभीर जखमी झाली आहे.
हल्ला झालेल्या महिलेवरती कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हल्ल्यामध्ये महिला गंभीर जखमी झालेली पाहिल्यानंतर हल्लेखोर रविंद्र घटनास्थळावरून पसार झाला होता. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी तीन पथके रवाना केली आहेत. याप्रकरणी गंभीर जखमी झालेल्या महिलेच्या वडिलांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. घटनास्थळी पोलीस उप अधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरिक्षक राजू ताशिलदार यांनी भेट देवून पाहणी करून घटनास्थळचा पंचनामा केला. याप्रकरणी कराड शहर पोलीस तपास करत आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण काय?
आगाशिवनगर (मलकापूर) ता. कराड येथील महिलेचं लग्न झालं असून नवऱ्यासोबत भांडण आणि वाद झाल्यामुळे ती महिला आपल्या माहेरी राहत होती. त्या महिलेला 3 मुले आहेत. या महिलेचा आरोपी रवींद्र याच्याशी पूर्वीची ओळख आहे. या परिचयातूनच त्यांची ओळख वाढली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. गुरुवारी दुपारी रवींद्र त्या महिलेच्या घरी गेला होता त्यांच्यात काही कारणास्तव वाद झाला. त्यानंतर रवींद्रने महिलेवर धारदार कोयत्याने वार केला. कोयत्याने केलेल्या हल्ल्यात तिच्या कानापासून जबड्यापर्यंत वार केला गेला आणि त्यामुळे ती महिला गंभीर जखमी झाली आहे.
हल्ला केल्यानंतर रवींद्र पवार घटनास्थळावरून पसार झाला. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. तर पीडित महिलेच्या वडिलांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी भेट देऊन घटनास्थळी पाहणी केली. घटनास्थळाचा पंचनामाही केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कराड शहर पोलीस करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
