Guillain Barre Syndrome: दिलासादायक! ससून रुग्णालयातून जीबीएस आजाराच्या पाच रुग्णांचा डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
Guillain Barre Syndrome: आज पुण्यातील ससून रुग्णालय येथे गुलेन बारी सिंड्रोम जीबी आजाराचे पाच रुग्णांना एकत्रित डिस्चार्ज देण्यात आलं आहे. ही मोठी दिलासादायक बाब आहे.

पुणे: पुणे, पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील इतर भागात गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) च्या रूग्णांची संख्या 149 वरती पोहोचली आहे. मृतांचा आकडा 5 आहे. पुणे शहारत गेल्या काही दिवसांपासून गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) या आजाराचे रुग्ण वाढत आहे. शहरात या आजाराचे 149 संशयित रुग्ण आढळून आले आहे. तर तीन संशयित रुग्णांचा मृत्यू देखील झालं आहे. यामुळे शहरात चिंतेचा वातावरण निर्माण झालं आहे. मात्र अस असलं तरी आज पुण्यातील ससून रुग्णालय येथे गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) आजाराचे पाच रुग्णांना एकत्रित डिस्चार्ज देण्यात आलं आहे. ही मोठी दिलासादायक बाब आहे. यावेळी या रुग्णांना फुलांचा पुष्पगुच्छ देत, पेढे भरवत डिस्चार्ज देण्यात आलं आहे. यावेळी या रुग्णांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पाहायला मिळालं.
पुण्यातील ससून रुग्णालय येथे जोबीएस रुग्णांचे 28 रुग्ण असून आज पाच रुग्णांना ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.एकनाथ पवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देण्यात आले. यावेळी अधीक्षक डॉ.यलप्पा जाधव, डॉ.रोहिदास बोरसे, डॉ. एच.बी.प्रसाद हे उपस्थित होते. ससूनमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोफत उपचार देण्यात येत आहे. यावेळी रुग्ण तसेच रुग्णाच्या नातेवाईकांच्या चेहेऱ्यावर स्मितहास्य पाहायला मिळालं.
डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती
डॉक्टरांनी माहिती देताना सांगितलं की, आपल्याकडे सध्या 28 रुग्ण आहेत. गेल्या पंधरा दिवसापासून जीबीएस आजाराचे रुग्ण पुण्यामध्ये जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. 100 पेक्षा जास्त रुग्ण सध्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये या आजाराबाबत काही प्रमाणात भीती निर्माण झाली आहे. परंतु आनंदाची बातमी ही आहे की, आपल्याकडचे पाच रुग्ण व्यवस्थित रित्या बरे होऊन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येत आहे आणि येत्या दोन-तीन दिवसात आणखी दहा रुग्ण बरे होत आलेले आहेत त्यांना देखील डिस्चार्ज देण्यात येईल. नागरिकांनी भीती वाटून घेऊ नये, या आजाराची काही लक्षणे आहेत.
पोट बिघडणे, ताप, सर्दी असं काही झालं तर तात्काळ डॉक्टरांना दाखवून घ्या. उपचार चालू करा. लवकर उपचार चालू केले तर शंभर टक्के रुग्ण हा बरा होतो. परंतु आठ दहा दिवसानंतर तुम्ही उपचार सुरू केले तर थोडेसे क्रिटिकल कंडिशन होते. त्यामुळे रुग्णांनी घाबरून न जाता लवकरात लवकर उपचार सुरू करावे आणि या आजारापासून वाचण्यासाठी शुद्ध पाणी प्या. पाणी उकळून गाळून प्या आणि दुसर अन्न व्यवस्थित शिजवलेलं खा, किंवा बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे. हे केल्याने आपण त्या आजारापासून बचाव करू. काही घाबरण्याचं कारण नाही, आतापर्यंतच्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे ते उपचारांसाठी उशिरा दाखल झालेले होते त्यांची कंडिशन थोडी क्रिटीकल होती असे डॉक्टरांनी सांगितला आहे.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
