एक्स्प्लोर

Pooja Khedkar : IAS पूजा खेडकर प्रकरणातील थर्मोव्हेरिटा कंपनी पालिकेकडून सील; हाच पत्ता वापरून मिळवलं अपंगत्वाचे प्रमाणपत्र

Pooja Khedkar : खेडकर कुटुंबाची थर्मोव्हेरिटा कंपनी ही अनधिकृत असल्याचं उघड झालं आहे. 2 लाख 77 हजारांचा कर थकवल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने थर्मोव्हेरिटा कंपनी कंपनी सील केली आहे.

Pooja Khedkar : ट्रेनी आयएएस पूजा खेडकरसह तिच्या कुटुंबाच्या (Khedkar Family) अडचणीत वाढ होताना दिसत आहेत. खेडकर कुटुंबाची थर्मोव्हेरिटा कंपनी ही अनधिकृत असल्याचं उघड झालं आहे. 2 लाख 77 हजारांचा कर थकवल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने (Pimpri Chinchwad Municipal Corporation) थर्मोव्हेरिटा कंपनी कंपनी सील केली आहे. ही कंपनीच अनधिकृत असल्याचीही माहिती समोर आली होती. रेडझोनमध्ये कंपनी उभारल्यामुळे ती अनधिकृत असल्याचं स्पष्ट झालं होतं.  

वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी याच थर्मोव्हेरिटा कंपनीचा पत्ता रहिवासी पत्ता म्हणून दिला होता. पिंपरी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी एबीपी माझाला यासंदर्भात एक्सक्लुझिव्ह माहिती दिली आहे. पिंपरी पालिकेचा कर थकवल्याप्रकरणी थर्मोव्हेरिटा कंपनीवर अखेर आज कारवाईचा बडगा उगारला आहे. 2 लाख 77 हजारांचा कर थकविला म्हणून आज कंपनी सील करण्यात आली आहे. आता कंपनी बाबत कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर खेडकर कुटुंबियांना आधी पालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे, सोबतच आधी थकीत कर ही भरावा लागणार आहे. याच कंपनीचा पत्ता वापरून IAS पूजा खेडकर यांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविले आहे. हीच कंपनी अनधिकृत असल्याचं ही समोर आलेलं आहे, त्याअनुषंगाने ही पालिकेकडून कारवाई सुरू आहे.

थर्मोव्हेरिटा कंपनीचा तब्बल 2 लाख 77 हजारांचा कर थकीत 

पिंपरी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे एबीपी माझाशी बोलताना सांगितलं, "रेकॉर्ड तपासल्यानंतर असं दिसून आलं की, 2009 पासून कर भरला जात होता, शेवटचा कर 2022 मध्ये भरण्यात आला होता. आतापर्यंतचा थकीत कर पाहिला तर तब्बल 2 लाख 77 हजारांचा थकीत कर आहे. त्यामुळे नियमानुसार, प्रॉपर्टी जप्त करण्याची जी कारवाई आहे, ती सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र महानगर पालिका अधिनियमात तरतूद आहे. जर एखाद्या प्रॉपर्टीवर कर देण्यात कोणी हलगर्जीपणा करत असेल किंवा कर वेळेत भरत नसेल, तर ती प्रॉपर्टी जंगम मालमत्ता आणि स्थावर मालमत्ता स्थिर करतो, त्या नियमानुसार आपली कारवाई केली जाईल."

कंपनीचा भाग रेड झोनमध्ये

"कंपनी ज्या भागात येते, तो भाग रेड झोनमध्ये येतो, त्यामुळे त्या भागातील सर्व कंपन्या अनधिकृत आहेत. त्यामुळे या कंपनीवर कारवाई केली जाईल. नियमांनुसार, अनधिकृत इमारत असेल, तर संबंधित मालकांना एक महिन्यांची नोटीस दिली जाते. त्यानंतर जी काही योग्य कारवाई असले, ती त्यांच्यावर केली जाते.", असं पिंपरी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Oscars 2025:
"भारत के लोगों को नमस्कार..." ऑस्कर सोहळ्यात होस्ट ओ'ब्रायनची हिंदीत सुरुवात, कुणी केलं कौतुक, तर कुणाकडून टीकेची झोड
संजय राऊत शिंदेंना म्हणाले, सावरकरांची शपथ घेऊन सांगा, अमित शाहांना पहाटे चारला फोनाफोनी केली की नाही? आता फडणवीस यांनी केला खुलासा!
संजय राऊत शिंदेंना म्हणाले, सावरकरांची शपथ घेऊन सांगा, अमित शाहांना पहाटे चारला फोनाफोनी केली की नाही? आता फडणवीस यांनी केला खुलासा!
Raksha Khadse : मोठी बातमी : कुंपणच शेत..., रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करणाऱ्या आरोपींमध्ये भाजपचाच माजी नगरसेवक, सध्या शिंदे गटात
कुंपणच शेत..., रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करणाऱ्या आरोपींमध्ये भाजपचाच माजी नगरसेवक, सध्या शिंदे गटात
Assembly Deputy Speaker : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला विधानसभा उपाध्यक्ष पद; अजित पवारांकडून चेहरा सुद्धा ठरला
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला विधानसभा उपाध्यक्ष पद; अजित पवारांकडून चेहरा सुद्धा ठरला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Parali Mahadev Munde case | परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरण, ज्ञानेश्वरी मुंडेंच आजपासून उपोषणJitendra Awhad : हातात बेड्या घालून थेट विधानसभेत, जितेंद्र आव्हाडांनी वेधलं साऱ्यांचं लक्षRohit Pawar Full PC : HSRP प्रकरणी रोहित पवार कडाडले, सरकारला धडकी भरवणारे आरोप!Sanjay Raut PC | हे सगळे बाटली बॉय, संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Oscars 2025:
"भारत के लोगों को नमस्कार..." ऑस्कर सोहळ्यात होस्ट ओ'ब्रायनची हिंदीत सुरुवात, कुणी केलं कौतुक, तर कुणाकडून टीकेची झोड
संजय राऊत शिंदेंना म्हणाले, सावरकरांची शपथ घेऊन सांगा, अमित शाहांना पहाटे चारला फोनाफोनी केली की नाही? आता फडणवीस यांनी केला खुलासा!
संजय राऊत शिंदेंना म्हणाले, सावरकरांची शपथ घेऊन सांगा, अमित शाहांना पहाटे चारला फोनाफोनी केली की नाही? आता फडणवीस यांनी केला खुलासा!
Raksha Khadse : मोठी बातमी : कुंपणच शेत..., रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करणाऱ्या आरोपींमध्ये भाजपचाच माजी नगरसेवक, सध्या शिंदे गटात
कुंपणच शेत..., रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करणाऱ्या आरोपींमध्ये भाजपचाच माजी नगरसेवक, सध्या शिंदे गटात
Assembly Deputy Speaker : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला विधानसभा उपाध्यक्ष पद; अजित पवारांकडून चेहरा सुद्धा ठरला
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला विधानसभा उपाध्यक्ष पद; अजित पवारांकडून चेहरा सुद्धा ठरला
Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांची विधिमंडळात सनसनाटी एन्ट्री, हातात बेड्या घालून अवतरले अन् म्हणाले...
जितेंद्र आव्हाड थेट बेड्या घालून विधानसभेत, सनसनाटी एन्ट्रीने विधानभवन चक्रावलं!
मारुती अल्टोमध्ये 6 एअरबॅग,कारची किंमत किती?
मारुती अल्टोमध्ये 6 एअरबॅग,कारची किंमत किती?
Raigad Crime : मॅट्रिमोनिअल साईटवरुन कर्जतच्या महिलेला तब्बल सात लाखांना गंडा; नाशिकच्या महाठगाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मॅट्रिमोनिअल साईटवरुन कर्जतच्या महिलेला तब्बल सात लाखांना गंडा; नाशिकच्या महाठगाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
'दलालीची दलाल'! दलालीच्या पैशातून महाराष्ट्राचा स्वाभिमान विकत घेण्याचे मनसुबे; रोहित पवारांनी पहिल्याच दिवशी महायुती सरकारचे 11 घोटाळे मांडत वेधले लक्ष
'दलालीची दलाल'! दलालीच्या पैशातून महाराष्ट्राचा स्वाभिमान विकत घेण्याचे मनसुबे; रोहित पवारांनी पहिल्याच दिवशी महायुती सरकारचे 11 घोटाळे मांडत वेधले लक्ष
Embed widget