एक्स्प्लोर

मृत्यूनंतरही यातना संपेना... महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत

Nashik News : महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंतिम संस्काराच्या प्रतीक्षेत पडून असल्याने मृत्यूनंतरही नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. पोलीस मात्र तिच्या नातेवाइकांच्या शोधात अहोरात्र कार्यरत आहे.

नाशिक : अनेकांच्या नशिबी जिवंतपणी नरक यातना असतेच, तर काहींच्या मृत्यूनंतरही यातना कमी होत नाही. निशा मयूर नागरे ऊर्फ श्वेता राजेश इंगळे महिलेच्या नशिबीही काही अशीच यातना आल्या आहेत. 30 ऑगस्टला त्यांचा खून झाला. नातेवाइकांच्या प्रतीक्षेत तेव्हापासून आजपर्यंत मृतदेह जिल्हा रुग्णालयात (Nashik Civil Hospital) पडून आहे. अंतिम संस्काराविना महिलेच्या मृतदेहास नरक यातना सहन कराव्या लागत आहे. 

निशा नागरे या महिलेचा गळा आवळून ३० ऑगस्टला खून करण्यात आला होता. इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) गुन्हा दाखल आहे. संशयितांचा शोध पोलीस घेत आहे. असे असले तरीही महिलेच्या कुटुंबीयांचा मात्र अद्याप शोध लागलेला नाही. कुटुंबीयांशिवाय तिच्या अंतिम संस्कारात बाधा येत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात तिचा मृतदेह अंतिम संस्काराच्या प्रतीक्षेत पडून आहे. 

महिलेचे वारसदार म्हणून कुणीही समोर आलेले नाही

पोलीस सर्वत्र तिच्या कुटुंबीयांचा तसेच अन्य नातेवाइकांचा शोध घेत आहे. मात्र अद्याप त्यांना त्यात यश आलेले नाही. परंतु अन्य कुणीही महिलेचे वारसदार म्हणून समोर आलेले नाही. अंतिम संस्काराशिवाय मोक्ष प्राप्ती होत नाही. असे म्हटले जाते. महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंतिम संस्काराच्या प्रतीक्षेत पडून असल्याने मृत्यूनंतरही नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. पोलीस मात्र तिच्या नातेवाइकांच्या शोधात अहोरात्र कार्यरत आहे.

नाशकात भर पावसात सरणावर ताडपत्री धरुन अंत्यसंस्कार

दरम्यान, नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अजूनही मुलभूत सुविधांचा अभाव दिसून येत आहे.  नाशिकच्या पेठ तालुक्यातील (Peth Taluka) कुंभाळे ग्रृप ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या डेरापाडा या तीनशे ते साडेतीनशे लोकसंख्या असलेल्या गावाला स्मशानभूमी निवारा शेड नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली होती. 6 सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती. डेरापाडा वासियांनी स्मशानभूमीला निवारा शेड नसल्याने भरपावसात सरणावर येणारे पावसाचे पाणी अडविण्यासाठी छत्र्यांचा व ताडपत्रीचा आसरा घेतला आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार केले होते. त्यामुळे मृत्यूनंतरही मृतदेहाला मरण यातना भोगाव्या लागतं असल्याची परिस्थिती नाशिक जिल्ह्यात पाहायला मिळाली. डेरापाडा गावात स्मशानभूमीला अंत्यसंस्कार विधीसाठी निवारा शेड लवकरात लवकर बांधून मिळावे, अशी मागणी नागरिकांनी केली. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Crime News: लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने केली प्रेयसीचा हत्या, रिक्षात मृतदेह टाकून लावला आईच्या घरासमोर; पिंपरीतील घटना

'बर्थ डे'ला हत्यांरांसह रिल्स काढणं भोवलं; भासक्या नावाच्या गुंडाला दाखवला हिसका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
राज्यात शिंदे सरकार पाहिजे होतं, सर्वांना आत टाकलं असतं; मनोज जरांगेचं मोठं वक्तव्य, फडणवीसांवर नाराजी
राज्यात शिंदे सरकार पाहिजे होतं, सर्वांना आत टाकलं असतं; मनोज जरांगेचं मोठं वक्तव्य, फडणवीसांवर नाराजी
शिंदे सरकारमधील शिवसेना मंत्र्‍यांच्या OSD ने मला 5 लाख मागितले, अमोल मिटकरींचा दावा; CM फडणवीसांचं कौतुक
शिंदे सरकारमधील शिवसेना मंत्र्‍यांच्या OSD ने मला 5 लाख मागितले, अमोल मिटकरींचा दावा; CM फडणवीसांचं कौतुक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jayant Patil And Chandrashekhar Bawankule Meet:जयंत पाटील आणि बावनकुळेंची भेट, भेटीत नेमकं काय ठरलं?Supriya Sule On Dhananjay Deshmukhअन्नत्याग आंदोलनाची माहिती घेण्यासाठी सुळेंचा धनंजय देशमुखांना फोनDr Amol Kolhe on Swarajyarakshak Sambhaji : स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा शेवट नेमका काय?Maharashtra Government Employees : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3 टक्यांनी वाढला

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
राज्यात शिंदे सरकार पाहिजे होतं, सर्वांना आत टाकलं असतं; मनोज जरांगेचं मोठं वक्तव्य, फडणवीसांवर नाराजी
राज्यात शिंदे सरकार पाहिजे होतं, सर्वांना आत टाकलं असतं; मनोज जरांगेचं मोठं वक्तव्य, फडणवीसांवर नाराजी
शिंदे सरकारमधील शिवसेना मंत्र्‍यांच्या OSD ने मला 5 लाख मागितले, अमोल मिटकरींचा दावा; CM फडणवीसांचं कौतुक
शिंदे सरकारमधील शिवसेना मंत्र्‍यांच्या OSD ने मला 5 लाख मागितले, अमोल मिटकरींचा दावा; CM फडणवीसांचं कौतुक
लेक अधिकारी बनली, शेतकरी बापाने गावी येताच वाजत गाजत मिरवणूक काढली; गुलालची उधळण अन् फुलांचा वर्षाव
लेक अधिकारी बनली, शेतकरी बापाने गावी येताच वाजत गाजत मिरवणूक काढली; गुलालची उधळण अन् फुलांचा वर्षाव
Maharashtra Goverment:  महाराष्ट्र विधीमंडळ समित्यांची घोषणा, भाजपच्या नेतृत्वाखाली नव्या सदस्यांची नियुक्ती, कोणाकोणाची वर्णी लागली?
महाराष्ट्र विधीमंडळ समित्यांची घोषणा, भाजपच्या नेतृत्वाखाली नव्या सदस्यांची नियुक्ती, कोणाकोणाची वर्णी लागली?
Indrajeet Sawant: देवेंद्र फडणवीसांनी कधीही जातीचा उल्लेख केला नाही, गृहमंत्री कारवाई करतील ही अपेक्षा: इंद्रजित सावंत
देवेंद्र फडणवीसांनी कधीही जातीचा उल्लेख केला नाही, गृहमंत्री कारवाई करतील ही अपेक्षा: इंद्रजित सावंत
धनंजय मुंडे सलग तिसऱ्या कॅबिनेट बैठकीला गैरहजर; पण 564 कोटींसाठी ट्विट, मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
धनंजय मुंडे सलग तिसऱ्या कॅबिनेट बैठकीला गैरहजर; पण 564 कोटींसाठी ट्विट, मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
Embed widget