Nashik News : भाजपाला भिडणार जुना शिवसैनिक, राष्ट्रवादीचे छगन भुजबळ विरोधी पक्षनेते पदाच्या शर्यतीत
Nashik News : विरोधी पक्षनेते पदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपल्या डॅशिंग व्यक्तिमत्वाने परिचित असलेले छगन भुजबळ हे विरोधी पक्षनेते पदी विराजमान होण्याची शक्यता आहे.
Nashik News : एकीकडे राज्यात सरकार स्थापन झाले असले तरी अद्याप मंत्री मंडळ निवड अद्यापही बाकी आहे. आज विधानसभा अध्यक्ष पदासाठी भाजपने (BJP) उमेदवारी अर्जही दाखल केला. या सर्वात महत्वाचं पद असलेल्या विरोधी पक्षनेते पदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपल्या डॅशिंग व्यक्तिमत्वाने परिचित असलेले छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे विरोधी पक्षनेते पदी विराजमान होण्याची शक्यता आहे.
सध्या राज्यात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सर्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे विराजमान झाले आहेत. त्यानंतर काही दिवसांतच मंत्रिमंडळ देखील निवडलं केली जाणार आहे. भाजप आणि शिंदे गट एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन झालं. आणि राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून बसले आहेत. शिवसेनेतून शिंदे गटाने बंडखोरी करीत साखर स्थापन केले. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस देखील सत्तेतून पायउतार झाले. आता भाजप आणि शिंदे गट स्थापन झाल्याने विरोधी पक्ष नेते पदासाठी कोण दावेदार ठरणार असा प्रश्न पडला आहे.
विरोधी पक्ष म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे तिन्ही पक्ष आहेत. सध्या शिवसेनेची घडी विस्कटली आहे. शिवसेनेतील महत्वाचे आणि निष्ठावान समजले जाणारे एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि १६ आमदार उरले आहेत. यामुळे शिवसेनेत सध्या तरी विरोधी पक्ष नेतेपदासाठी दावेदार दिसून येत नाही. त्यानंतर काँग्रेस पक्षाचा विचार केला तर दहा दिवसाच्या राजकीय घडामोडीनंतर ज्या पद्धतीने त्यांनी आपली भूमिका मंडळी आहे, त्यानुसार हे पद राष्ट्रवादीकडे त्यांनी सोपविल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आता राष्ट्रवादीमध्ये कोणता नेता प्रभावीपणे सत्तेत असलेल्या पक्षाला जाब विचारू शकतो, तर छगन भुजबळ.
छगन भुजबळच का?
छगन भुजबळ यांची सुरवात मुळात शिवसेनेतूनच झाली. मॅकॅनिकल इंजीनियरिंगमध्ये डिप्लोमा मिळवल्यानंतर भुजबळ बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन शिवसेनेशी जुळले. पुढे 1973 मध्ये भुजबळ यांनी पहिल्यांदा शिवसेनेकडून नगरसेवकासाठी निवडणूक लढवली. ते निवडूणही आले. 1973 ते 1984 दरम्यान मुंबईच्या नगरसेवकांमध्ये भुजबळ यांचे नेतृत्व प्रभावी होते. यामुळेच ते दोन वेळा मुंबई महानगरपालिकेचे महापौरही राहिलेत. मुंबईचे महापौर म्हणून आपली छाप सोडणारे छगन भुजबळ 1985च्या निवडणुकीनंतर आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले होते. शिवसेनेचा आक्रमक बाणा त्यांच्या नसानसांत भिनलेला होता. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर ते हल्लाबोल करत होते.
त्यानंतर 1991 साली शिवसेनेला 'अखेरचा जय महाराष्ट्र' करण्याची धमक दाखवून छगन भुजबळ यांनी खळबळ उडवून दिली होती. छगन भुजबळ राष्ट्रवादीत गेले. त्याच वर्षी काँग्रेस-राष्ट्रवादीचं आघाडीचं सरकार सत्तेत आलं आणि भुजबळ महाराष्ट्राचे गृहमंत्री झाले. त्यांनतर आलेल्या सत्तेत पहिल्यांदा ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनले. प्रत्येक वेळी त्यांनी विरोधी पक्ष असो किंवा सत्तेत असलेला पक्ष असो भुजबळांनी प्रभावीपणे सामना केल्याचे पाहायला मिळते.