Nanded Crime : अंध आई - वडिलांचा डोळस आधार असणाऱ्या अल्पवयीन चिमुरडीचा काकानेच केला घात, अपहरण करून केला खून
चिमुरडीचा तिच्या सख्ख्या काकाने अपहरण करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
नांदेड : नांदेड शहरातील तेहरानगर परिसरात राहणाऱ्या दृष्टीहीन कुटुंबातील पाच वर्षीय चिमुरडीचा तिच्या सख्ख्या काकाने अपहरण करुन खून केल्याची धक्कादायक घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
तेहरानगर परिसरात अंध - दिव्यागांचे 20 ते 25 परिवार वास्तव्यास आहेत. यातील दृष्टीहीन अंकुश हाटेकर यांच्या कुटुंबातील पाच वर्षीय चिमुरडीचा तिच्या सख्ख्या काकाने अपहरण करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. नराधम काका संतोष हाटेकर याने 16 ऑगस्टला दुपारी बाहेर अंगणात खेळत असणाऱ्या भावाच्या मुलीचे अपहरण करून निघृण खून करून प्रेत गोदावरी नदी पात्रात फेकून दिले. दरम्यान या प्रकरणी पीडित चिमुरडीचे आई - वडिल परिसरातील सात ते आठ अंध व्यक्तींसह शिवाजीनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता त्यांचे म्हणणे न ऐकल्यामुळे दिव्यांगानी माजी पालकमंत्री यांना फोनवरून पोलिस गुन्हा दाखल करत नसल्याचे कळवले.
शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी संतोष हाटेकरला ताब्यात घेऊन चौकशी करून सोडून दिले. दरम्यान घटना घडल्यानंतर तिसऱ्या दिवशी गोदावरी नदी पात्रात चिमुरडीचा मृतदेह आढळून आला आहे. ज्यामुळे शिवाजीनगर पोलिसांच्या बेजबाबदारपणाचा कुटुंबाने संताप व्यक्त केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी कुटुंबाने केली आहे. जोपर्यंत आरोपी आणि दोषी पोलिस अंमलदारास निलंबित करून कारवाई करणार नाही तोपर्यंत चिमुरडीचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा अंध कुटुंबाने व शहरातील दिव्यांग,अंध बांधवांनी घेतला आहे.
संबंधित बातम्या :