एक्स्प्लोर

Nanded : नांदेड-लातूर महामार्गावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत दहावीचा 17 वर्षीय विद्यार्थी जागीच ठार

Nanded Accident : दुचाकीवरुन जाणाऱ्या भागवत शिंदे नावाच्या विद्यार्थ्याला ट्रकची धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडली. 

नांदेड : नांदेड-लातूर राष्ट्रीय महामार्गावर खरबी फाटा येथे सोमवारी (23 फेब्रुवारी) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दहावीत शिकणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. भागवत श्यामसुंदर शिंदे (रा. जानापुरी) असं मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

भागवत शिंदे हा दुचाकीवरून घराकडे जात होता. खरबी फाट्यावरून जानापुरीकडे वळताना तो रस्ता ओलांडत असताना नांदेडकडून लातूरच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की भागवतचा जागीच मृत्यू झाला.

भरधाव ट्रकची जोरदार धडक (Highway Accident Nanded-Latur)

अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र गंभीर दुखापतीमुळे भागवतची प्राणज्योत मालवल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.

दहावीच्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक स्वप्न अपुरे (Class 10 Student Death)

सध्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू असून भागवतही परीक्षेला बसला होता. परीक्षा काळातच त्याच्यावर काळाने झडप घातल्याने त्याचे शैक्षणिक स्वप्न अपुरे राहिले. एका उमद्या विद्यार्थ्याच्या अकाली निधनाने जानापुरी गावावर आणि त्याच्या शाळेत शोककळा पसरली आहे.

पोलिसांची कारवाई सुरू (Police Investigation Sonkhed)

घटनेची माहिती मिळताच सोनखेड पोलीस ठाणे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पुढील तपास सुरू असून अपघाताची नेमकी कारणे शोधली जात आहेत.

ही बातमी वाचा:

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
अकलूजच्या घोडेबाजाराला दुष्काळाची झळ; 51 लाखांचा सिकंदर, 25 लाखांचे अनेक घोडे, पण चारा-पाण्याचा प्रश्न कायम
अकलूजच्या घोडेबाजाराला दुष्काळाची झळ; 51 लाखांचा सिकंदर, 25 लाखांचे अनेक घोडे, पण चारा-पाण्याचा प्रश्न कायम
Hardik Pandya : हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंगच्या ट्रेडमध्ये सर्वाधिक फायदा कोणाचा? मुंबई नव्हे पंजाबच फायद्यात, मोहम्मद कैफ म्हणाला...
हार्दिक आणि अर्शदीपच्या ट्रेडमध्ये फायदा कोणाचा? पंजाबचं नाव घेत मोहम्मद कैफ म्हणाला...
Embed widget