एक्स्प्लोर

नांदेडमध्ये हळूहळू घड्याळ बंद होतंय, कसं चालू ठेवायचं हा मोठा विषय, अशोक चव्हाणांचा चिखलीकरांना टोला 

नांदेडमध्ये आता हळूहळू घड्याळ बंद होत आहे. ते कसं चालू ठेवायचं हा मोठा विषय आहे असं म्हणत भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे आमदार प्रतार पाटील चिखलीकरांना टोला लगावला.

Ashok Chavan : नांदेडमध्ये आता हळूहळू घड्याळ बंद होत आहे. ते कसं चालू ठेवायचं हा मोठा विषय आहे असं म्हणत भाजप खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना टोला लगावला.  महापालिकेने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अशोक चव्हाण बोलत होते. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा नाव न घेता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

महापौर जरी भाजपचा असला तरी केंद्रबिंदू अशोक चव्हाण

महापालिकेच्या पत्रकार परिषदमध्ये खासदार अशोक चव्हाण बोलत होते. यावेळी त्यांनी विकासकामांचा आढावा मांडला.  पत्रकार परिषद महापालिकेने आयोजित केली होती. महापौर जरी भाजपचा असला तरी केंद्र बिंदू अशोक चव्हाण आहेत. आज महापौर उपमहापौर फक्त बघ्याच्या भूमिकेत असल्याचं पाहायला मिळालं. नांदेड वाघाळा महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौर कविता मुळे उपमहापौर दीपक रावत सभागृह नेते महेश कनकदंडे यांची पहिलीच पत्रकार परिषद आज पार पडली याच पत्रकार परिषदेमध्ये शहराचा विकास आराखडा हा महापौर कविता मुळे यांनीन मांडता हा राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनी शंभर दिवसात काय विकास करणार आहोत या संदर्भात माहिती दिली. त्यामुळे या पत्रकार परिषदेची सध्या जोरदार चर्चा रंगत आहे.

नांदेड पालिकेत 28 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचा महापौर विराजमान 

पहिलीच पत्रकार परिषद महापौर आपल्या संकल्पना मांडतील असे सर्वांनाच वाटले होते, मात्र त्यांच्या या पत्रकार परिषदेमध्ये अशोक चव्हाण यांनीच विकास कामासंदर्भात माहिती दिली. 28 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचा महापौर विराजमान झालेला आहे. त्यात अशोक चव्हाण यांचा सिंहाचा वाटा होता. महापौर मिळाला तरी नांदेड महापालिकेचे केंद्रबिंदू अशोक चव्हाणच आहेत हे आजचा पत्रकार परिषद मधून सिद्ध झाले. 

नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात भाजपला घवघवीत यश

नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात पक्षाला घवघवीत यश मिळवून दिल्यानंतर खासदार अशोक चव्हाण यांचे पक्षात वजन वाढले आहे. महापालिका पहिल्यादांच भाजपाच्या ताब्यात आली असून बहुमतासह इथे पक्षाने आपला महापौर बसवला आहे. तर त्याआधी जिल्ह्यातील तीन तालुक्यात भाजपाचे नगराध्यक्ष आणि सत्ता आली. अर्थात या निवडणुकीची सगळी सूत्रं पक्षाने अशोक चव्हाण यांच्याकडेच सोपवली होती. पक्षाला जिल्ह्यात चांगले यश मिळवून दिल्यानंतर आता नांदेडमध्ये अशोक चव्हाण म्हणतील तेच भाजपाचे नेते मान्य करत असल्याचे दिसून आले आहे

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आईने दागिने विकले, वडिलांनी सावकाराकडून कर्ज घेतले; श्रीकांत शिंदेंचं संसदेत भावनिक भाषण
आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आईने दागिने विकले, वडिलांनी सावकाराकडून कर्ज घेतले; श्रीकांत शिंदेंचं संसदेत भावनिक भाषण
Nitin Gadkari: नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
Jalgaon Crime News: ना सरकारी नोकरी, ना स्वतःचे घर, म्हातारे वडिलही सोबत राहणार...; लग्नासाठी लागोपाठ मिळालेल्या नकाराने खचलेल्या तरूणाचं टोकाचं पाऊल, जळगावातील घटना
ना सरकारी नोकरी, ना स्वतःचे घर, म्हातारे वडिलही सोबत राहणार...; लग्नासाठी लागोपाठ मिळालेल्या नकाराने खचलेल्या तरूणाचं टोकाचं पाऊल, जळगावातील घटना
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
Priyanka Gandhi : लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
Shalarath ID Fraud Nashik : शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई! भाजप पदाधिकाऱ्याला सोलापुरातून अटक; शासनाची 160 कोटींची फसवणूक
शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई! भाजप पदाधिकाऱ्याला सोलापुरातून अटक; शासनाची 160 कोटींची फसवणूक
आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आईने दागिने विकले, वडिलांना सावकाराकडून कर्ज घेतले; श्रीकांत शिंदेंचं संसदेत भावनिक भाषण
आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आईने दागिने विकले, वडिलांना सावकाराकडून कर्ज घेतले; श्रीकांत शिंदेंचं संसदेत भावनिक भाषण
Paper Leak Bill : कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
Nitin Gadkari: नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
Embed widget