एक्स्प्लोर

पालघरमधील भूकंपांच्या सावटाखाली तारापूर आणि बीएआरसीला धोका?, हायकोर्टात अभियांत्रिकी विद्यार्थ्याची याचिका

अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी राज्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कितपत सज्ज आहे? यावर या याचिकेतून राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागण्यात आलं आहे.

मुंबई : पालघरमधील भूकंपांच्या घटनांनंतर तारापूर आणि बीएआरसीमधील अणुऊर्जा प्रकल्प बंद करा, अशी मागणी करत ताह निझाम या 21 वर्षीय अभियांत्रिकी शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल केली आहे. हे दोन्ही अणुऊर्जा प्रकल्प सध्या पूर्णपणे कार्यान्वित असल्यानं त्यांना भूकंपामुळे काही नुकसान झाल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते, अशी भीती या याचिकेतून व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी राज्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कितपत सज्ज आहे? यावर या याचिकेतून राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागण्यात आलं आहे.
तारापूरचा अणुऊर्जा प्रकल्प हा पालघरमध्येच असून भाभा अणुऊर्जा प्रकल्प हा पालघरपासून अवघ्या 70 किमीच्या अंतरावर आहे. साल 2018 मधील नोव्हेंबर आणि डिसेंबरमहिन्यात पालघर जिल्ह्यात छोटे मोठे असे मिळून एकूण 29 भूकंपाचे झटके बसले आहेत. या याचिकेवर लवकरच हायकोर्टात सुनावणी होणं अपेक्षित आहे.
पालघर भूकंप : तात्पुरत्या निवासासाठी घराजवळ लहान तंबू उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश भूकंपामुळे ज्या भागात हानी झाली आहे त्या भागातील रहिवाशांना निवासाची तात्पुरती सोय म्हणून त्यांच्या घराजवळ लहान तंबूंची व्यवस्था करावी, यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. याचबरोबर घरे बांधण्याकरिता रेट्रो फिटिंगसाठीचा तसेच इतर तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनास दिले आहेत.भूकंप जाणवल्यानंतर जिल्हा प्रशासनामार्फत केलेल्या उपाययोजनांबाबतचे सादरीकरण जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे यांनी केले. त्या उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत भूकंपरोधक घरे बांधणे बंधनकारक आहे. त्यास निधी कमी पडत असल्यास तो वाढवून देण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील. ज्या भागात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत तेथे यापुढे सर्व घरे भूकंपरोधक बांधणे आवश्यक करावे. विजेच्या जुन्या खांबांमुळे हानी होऊ नये यासाठी असे खांब तातडीने बदलून नवीन खांब उभारावेत. जवळच असलेल्या कुर्झे धरणाच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन त्यामध्ये अत्यावश्यक असलेल्या दुरूस्त्या तातडीने करण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले होता. . धुंदलवाडी जवळ भूकंपाचे केंद्र , 17 गावे प्रभावित जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी उपाययोजनांबाबत सादरीकरण करताना डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी जवळ भूकंपाचे केंद्र असून जवळपासची 17 गावे प्रभावित झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले, भूकंपग्रस्त भागातील रहिवाशांसाठी आतापर्यंत 500 टारपोलीनचे वाटप करण्यात आले आहे. 1500 घरांचा सर्व्हे झाला असून त्यापैकी 1300 घरे मदतीसाठी पात्र आहेत. रात्री भीती वाटू नये यासाठी पोलिसांमार्फत गस्त घालण्यात येत आहे.  आश्रमशाळांमध्ये विशेष लक्ष देण्यात येत असून विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये याला प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांना आवश्यकतेनुसार बांबू आणि टारपोलीनचे तंबू देण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. रहिवाशांच्या सोयीसाठी नियंत्रण कक्ष स्थापून त्याचे क्रमांक देण्यात आले आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
आष्टा नगरपालिका 'मतदार' राड्यानंतर स्ट्राँग रुमची पाहणी, कार्यकर्त्यांचा गोंधळ; जयंत पाटलांची मोठी मागणी
आष्टा नगरपालिका 'मतदार' राड्यानंतर स्ट्राँग रुमची पाहणी, कार्यकर्त्यांचा गोंधळ; जयंत पाटलांची मोठी मागणी
Illegal Bike Taxi : बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट
Maharashtra Municipal Election 2025 : जिल्हा परिषदांऐवजी महापालिका निवडणूक आधी होणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 डिसेंबर 2025 | बुधवार
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
शेतकरी मदतीचा प्रस्तावच दिला नाही म्हणत केंद्रानं 26/11 पर्यंतची आकडेवारी दिली, फडणवीस म्हणाले, ते जुनं उत्तर; रोहित पवार 27/11चं पत्र दाखवत म्हणाले, फडणवीस साहेब अजून किती खोटं बोलणार?
आष्टा नगरपालिका 'मतदार' राड्यानंतर स्ट्राँग रुमची पाहणी, कार्यकर्त्यांचा गोंधळ; जयंत पाटलांची मोठी मागणी
आष्टा नगरपालिका 'मतदार' राड्यानंतर स्ट्राँग रुमची पाहणी, कार्यकर्त्यांचा गोंधळ; जयंत पाटलांची मोठी मागणी
Illegal Bike Taxi : बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या  रॅपीडो, उबेर  सारख्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा, परिवहन मंत्र्यांचा आदेश
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
संचार साथी अ‍ॅप मोबाईलमध्ये प्री-इन्स्टॉल नसणार; देशव्यापी फटकार बसताच केंद्र सरकारनं यू टर्न घेत नाद सोडला!
मोठी बातमी! पुण्याच्या जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अटक; 300 कोटींच्या गैरव्यवहारात कारवाई
मोठी बातमी! पुण्याच्या जमीन घोटाळ्यातील आरोपी शीतल तेजवानीला अटक; 300 कोटींच्या गैरव्यवहारात कारवाई
अन्यथा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणणार; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
अन्यथा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक आयुक्तांवर महाभियोग प्रस्ताव आणणार; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं
Nanded Crime Love Story: नांदेडच्या प्रेमप्रकरणाचा जातीय विखारामुळे भयंकर शेवट, सक्षम ताटेची केस प्रकाश आंबेडकर लढवणार का? अंजली आंबेडकर म्हणाल्या...
सक्षम-आचलला न्याय देण्यासाठी प्रकाश आंबेडकर कोर्टात युक्तिवाद करणार? अंजली आंबेडकर म्हणाल्या...
Embed widget