एक्स्प्लोर

देवाभाऊंनी दिलेला शब्द पाळला! शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण, अनिल बोडेंनी केलं स्वागत

देवाभाऊंनी बळीराजाला दिलेला तो शब्द पाळला आहे. शेतकऱ्यांना सावरण्यासाठी दिलासा देण्यासाठी ही कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले. 

Anil Bonde : राज्याचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ अंतर्गत ही कर्जमाफी लागू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या योजनेनुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. यावर भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवाभाऊंनी बळीराजाला दिलेला तो शब्द पाळला आहे. शेतकऱ्यांना सावरण्यासाठी दिलासा देण्यासाठी ही कर्जमाफी अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी सांगितले. 

 पुन्हा शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडू नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत 

संकटात सापडलेल्या बळीराजाला सांत्वना देताना देवा भाऊंनी सांगितलं होतं, संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचं विज बिल माफ करण्यात आलं आहे. ग्रामीण भागातील घरकुल, लाडक्या बहिणींचे पैसे, जलयुक्त शिवाराची कामे अशा बाबींना अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दिलासा देण्यात आला. पाणी मिळेल, वीज मिळेल, कर्ज सुद्धा माफ होईल, पुन्हा शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडू नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत असे बोंडे म्हणाले. त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बोंडे यांनी आभार मानले. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सरकारवर टीका

कर्जमाफी योजना फसवी आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच.अटी शर्ती घालून दिलेली कर्जमाफी शेतकरी हिताची नाही असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी कर्जमाफी योजनेवर टीका केली. राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याची घोषणा केली आहे. मात्र, ही घोषणा फसवी असल्याचे संदीप जगताप म्हणाले. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु, अशा घोषणा सरकारने केल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात अटी शर्ती घालून केवळ 2 लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. ती ही 30 सप्टेंबर 2025 पर्यंतची. यामुळं शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला असून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच नाही असेही जगताप म्हणाले.

शेतकऱ्यांनी जनावरे विकून कर्ज फेडले, सरसकट कर्जमाफी करणे गरजेचं, शेतकरी कामगार पक्षाची मागणी

राज्य सरकारनं केलेली कर्जमाफी दुर्दैवी असल्याचे शेतकरी कामगार पक्षाने म्हंटलं आहे. शेतकऱ्यांनी जनावरे विकून कर्ज फेडलेले आहे, म्हणून सरसकट कर्जमाफी अपेक्षित होती. शेतकऱ्यांच्या आत्महत्यामुळं महाराष्ट्राचा मसनवाटा झाला असताना शेतकरी अशा घोषणा करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणार असतील तर हे निंदनीय आहे. या कर्जमाफी विरोधात आम्ही शेतकऱ्यांसोबत आंदोलन उभं करणार आहोत. सरकारला द्यायचे असेल तर सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे. 

 

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यसभा टर्म संपत येताच खासदारकी ठेवण्यासाठी रामदास आठवले एकीची भाषा करतात, आनंदराज आंबेडकरांचा टोला 
राज्यसभा टर्म संपत येताच खासदारकी ठेवण्यासाठी रामदास आठवले एकीची भाषा करतात, आनंदराज आंबेडकरांचा टोला 
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 एप्रिल 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 एप्रिल 2026 | रविवार
एका बाजूला तापमानाचा पारा 44 अंशावर, तर दुसऱ्या बाजूला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, शेतकऱ्यांची चिंता वाढली
एका बाजूला तापमानाचा पारा 44 अंशावर, तर दुसऱ्या बाजूला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, शेतकऱ्यांची चिंता वाढली
गौतम अदानींची मोठी घोषणा, 'या' प्रकल्पात करणार 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 143 एकरमध्ये होणार काम
गौतम अदानींची मोठी घोषणा, 'या' प्रकल्पात करणार 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 143 एकरमध्ये होणार काम
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली
Vishwas Nangare Patil : 5 मिनिटात प्रेरणादायी विचार नांगरे पाटलांचे कोकरूडमधील भाषण
Rohit Pawar Latur : VSR कंपनीच्या मालकांना सरकार एवढे का घाबरत आहे? रोहित पवार यांचा सवाल
PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Ajit Agarkar: अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
Ravichandran Ashwin: चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
Embed widget