Mumbai: परमबीर सिंह वसूली प्रकरणात नवा खुलासा, सॉफ्टवेअरचा वापर करून छोटा शकीलचा आवाज काढला; सीआयडीची माहिती
Mumbai: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह इतरांविरुद्ध दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्याची चौकशी करणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CID) हाती नवी माहिती लागलीय.
Mumbai: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांच्यासह इतरांविरुद्ध दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्याची चौकशी करणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CID) हाती नवी माहिती लागलीय. दरम्यान, संजय पुनमियानं व्यावसायिक श्याम सुंदर अग्रवालला फसवण्यासाठी विशेष सॉफ्टवेअरद्वारे छोटा शकीलचा आवाज काढण्यात आला होता. तसेच हा फोन खरा वाटावा म्हणून व्हीपीएनचा वापर करण्यात आला, असं सीआयडीच्या चौकशीतून समोर आलंय.
दरम्यान, कुणालाही संशय येऊ नये म्हणून पुनमियानं सायबर तज्ज्ञाच्या मदतीनं हे संपूर्ण कृत्य केलं. या प्रकरणी सीआयडी अजूनही तपास करत असून लवकरच आरोपपत्र दाखल करणार आहे. सीआयडीने संबंधित सायबर तज्ज्ञाचा जबाबही नोंदवून घेतलाय. या सायबर तज्ज्ञानं या प्रकरणातील आरोपी आणि संशयितांना तांत्रिक मदत केल्याचा संशय आहे.
श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात परमबीर सिंग, संजय पुनमिया, बिल्डर सुनील जैन यांच्यासह दोन एसीपी अधिकारी, एक डीसीपी आणि दोन पीआय अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी मरीनड्राइव्ह पोलिसांनी गेल्या वर्षी पुनमिया आणि जैन यांना अटक केली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण सीआयडीकडं सोपवण्यात आलं होतं. या प्रकरणाचा तपास सीआयडीनं हाती घेतला असता तपासादरम्यान पीआय नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांना अटक करण्यात आली.
नेमकं प्रकरण काय?
अग्रवाल यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, परमबीर सिंह आणि त्यांच्या माणसांनी त्यांना मकोका प्रकरणात अडकल्याचं सांगितलं. तसेच अग्रवाल यांच्यावर 50 लाख रुपये आणि काही मालमत्तांसाठी दबाव आणण्याचा त्यांचा डाव होता. परमबीर सिंह यांना अँटिलिया प्रकरणात अडकवल्यानंतरच के अग्रवाल यांनी त्यांच्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे तक्रार केली.
सीआयडीच्या तपासात असे आढळून आले की, आरोपीनं फोन कॉलचा आवाज शकीलच्या आवाजाशी जुळण्यासाठी काही सॉफ्टवेअर वापर केला. त्यावेळी असं दाखवण्यात आलं होतं की हा कॉल अग्रवालच्या वतीनं पुनमियाला करण्यात आला. तसेच अग्रवालचे छोटा शकीलशी जवळचे संबंध असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला गेला. पाकिस्तानस्थित गँगस्टर छोटा शकील आणि त्याचाच आधार घेत परमबीर सिंग आणि त्याच्या साथीदारांनी अग्रवालविरुद्ध मकोकाचा गुन्हा दाखल केला.
पुनामिया यांना 2016 आणि 2017 मध्ये परमबीर सिंह ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना धमकीचे कॉल करण्यात आले होते आणि ठाणे पोलिसांनी अग्रवाल यांच्यावरही गुन्हे दाखल केले होते. नोव्हेंबर 2020 मध्ये, पुनमियाला आणखी एक बनावट कॉल करण्यात आला होता ज्याच्या आधारे जुहू पोलिसांनी अग्रवाल विरुद्ध MCOCA अंतर्गत गुन्हा दाखल केला, असं सीआयडीच्या चौकशीतून समोर आलं.
हे देखील वाचा-
- kalyan : काकीनाडा भावनगर एक्सप्रेसमध्ये लूटमारीचा प्रयत्न, आरोपीत 14 वर्षीय मुलाचाही समावेश
- रिक्षाचालकाचं प्रसंगावधान, रागाच्या भरात दिल्ली सोडून वसई गाठलेल्या अल्पवयीन मुलीची पुन्हा वडिलांशी भेट
- भीषण! पुणे-मुंबई महामार्गावर लोणावळ्यानजीक अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha