एक्स्प्लोर

kalyan : काकीनाडा भावनगर एक्सप्रेसमध्ये लूटमारीचा प्रयत्न, आरोपीत 14 वर्षीय मुलाचाही समावेश

kalyan : काकीनाडा भावनगर एक्सप्रेसमध्ये घडलेल्या घटनेत 14 वर्षीय मुलाचाही समावेश आहे. कल्याण जीआरपी पोलिसांच्या सतर्कतेमुळे पाचही आरोपी ताब्यात आहेत.

kakinada bhavnagar express : काकीनाडा भावनगर मेल एक्सप्रेसमध्ये लूटपाट करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला कल्याण जीआरपी पोलिसांनी अटक केली होती. 27 फेब्रुवारी रोजी, कल्याणमध्ये पाच जणांच्या टोळक्यांनी प्रवाशांची लूटमार करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत काही प्रवाशांनी 100 नंबर वर फोन करून नियंत्रण कक्षातून कल्याण जीआरपी आणि आरपीएफला माहिती दिली. त्यानंतर आरपीएफ जवानाने या पाच जणांना त्वरित ताब्यात घेतले. या सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या पाच आरोपींमध्ये एका 14 वर्षीय मुलाचादेखील समावेश आहे. या आरोपींना आज न्यायालयात हजर केले. चार आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पोलिस पुढील तपास करीत आहेत.

काय आहे नेमकी घटना?

वसई येथे राहणाऱ्या जया पिसे या महिला त्यांच्या मुलीसोबत काकीनाडा भावनगर एक्सप्रेसमधून प्रवास करीत होत्या. त्या सोलापूर येथून गाडीत बसल्या होत्या. 27 जानेवारी रोजी गाडी कर्जत स्टेशनजवळ आली असता काही प्रवाशांनी चोर चोर असा आरडाओरडा सुरु केला. याच दरम्यान चार ते पाच जण महिलेच्या जवळ आले. वस्तूने भरलेली बॅग हिसकावून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता जया यांनी त्यांना प्रतिकार केला. एकाने चाकूचा धाक दाखवित महिलेकडील बॅग हिसकावून घेतली. याच दरम्यान एका सतर्क नागरिकाने 100 नंबरवरुन पोलिसांना फोन करून घडलेला सगळा प्रकार स्पष्ट केला. त्यानुसार, नियंत्रण कक्षातून कल्याण जीआरपी आणि आरपीएफला माहिती दिली गेली. या ट्रेनमध्ये ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवानाने त्वरीत या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना कल्याण जीआरपीच्या हवाली केले. 

पाचही आरोपी पुण्याचे 

याबाबत कल्याण जीआरपीच्या महिला पोलिस निरिक्षक अर्चना दुसाणे यांनी हे पाचही आरोपी पुणे येथील कोंढवा या परिसरात राहणारे आहेत असे सांगितले. तबरेज शेख ,दानिश खान, अजय दबडे, निजान शेख,आणि एका 14 वर्षीय मुलाचा समावेश आहे. कल्याण रेल्वे कोर्टात या चार जणांना हजर केले असता चारही आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या आरोपींची पोलिस कसून चौकशी करत आहेत.  

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget