एक्स्प्लोर

शरद पवारांचा पदाधिकारी, गुरुजी बनून फसवणूक,रोजं नवं सीम, 3 धाम यात्रेनंतर आयोध्येला जाण्याआधी बेड्या!

शरद पवार यांच्या पक्षातील मोठ्या पदावर असणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांना तीन धाम यात्रा करावी लागली. अयोध्येला जाण्यापूर्वीच बोरिवली पोलिसांनी अटक केली. 

Mumbai Crime : मुंबईच्या चारकोप परिसरात राहणारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे पदाधिकारी गुरुजी उर्फ ऋषी पांडे याला महिलेच्या फसवणूक प्रकरणी बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे.राष्ट्रवादीचा पदाधिकारी असलेल्या ऋषी पांडे याने गुरुजी बनून फसवणूक केली. तो पोलिसांसोबत ओळख आहे तुम्हाला मदत करतो असे सांगून अनेकांकडून लाखो रुपये उकळत होता. यायाप्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आरोपीच्या मागावर असलेल्या पोलिसांना गुंगारा देत आरोपी ऋषी पांडे हा मथुरा, गुजरात सोमनाथ उज्जैन अशा विविध मंदिरात जाऊन  देवदर्शन करून अयोध्येला जाण्याच्या तयारीत असतानाच बोरिवली पोलिसांनी  गुजरात येथून अटक केली आहे. आरोपी सध्या बोरिवली पोलिसांच्या ताब्यात असून त्याने कुणाकुणाची फसवणूक केली यासंदर्भात अधिक तपास सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरिवली परिसरात राहणाऱ्या एका महिलेने फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती, यानंतर या फेसबुक पोस्टवरून मोठा वादही निर्माण झाला होता. प्रकरण बोरिवली पोलीस ठाण्यात गेले. दरम्यानच्या काळात महिलेची ओळख गुरुजी उर्फ ऋषी पांडे सोबत झाली. ऋषी पांडे याने माझी पोलिसांसोबत ओळख असून प्रकरण दडपून टाकण्यासाठी महिलेकडून पोलिसांच्या नावावर चेक द्वारे लाखो रुपये घेतले, मात्र या प्रकरणात कृषी पांडेंकडून महिलेला कोणतीही मदत झाली नाही.

याबाबत महिलेने ऋषी पांडेंकडे पैसे मागण्यासाठी तगादा लावला. पांडेंने महिलेचे फोन घेणे बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या ध्यानात येताच तिने गुरुजी उर्फ ऋषी पांडे विरोधात तक्रार दिली. बोरिवली पोलिसांनी आरोपी विरोधात कलम 420 अन्वये गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी एपीआय बापू घोडके व पीएसआय कल्याण पाटील यांच्या तपास आरोपीचा माग घेण्यास सुरुवात केली. तेव्हापासून आरोपी गुरुजी उर्फ ऋषी पांडे पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आपला मोबाईलनंबर बदलून उत्तर भारतात देव दर्शनासाठी फिरू लागला. आरोपीने मध्य प्रदेश उज्जैन गुजरात सोरटी सोमनाथ या ठिकाणच्या धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. अयोध्येला जाण्यापूर्वीच बोरवली पोलिसांनी त्याला गुजरात सुरत येथून अटक केली आहे.

बोरिवली पोलिसांनी आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.  बोरिवली पोलीस आरोपीने अजून कुणाकुणाची फसवणूक केली आहे का? या संदर्भात अधिकचा तपास करत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Latur : अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Ratnagiri Speech : एकदा सत्ता द्या.. केरळ, गोव्याला मागे टाकू; राज ठाकरेंचं आश्वासनUddhav Thackeray Speech | नाला&%$ एकही मत पडायला नको; गायकवाडांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गरजलेABP Majha Headlines :  2 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Dhule:आचारसंहिता संपताच महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा;फडणवीसांची इच्छा पूर्ण करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Latur : अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Embed widget