एक्स्प्लोर

मुंबईत बहिण आणि मेहुण्यावर गोळ्या झाडून तरुणाची आत्महत्या

बहिण वंदनाने (वय 20 वर्ष) सहा महिन्यांपूर्वी बटेश्वरचा मित्र रोहित सिंहसोबत (वय 27 वर्ष) प्रेमविवाह केला होता. परंतु रोहित सिंह दुसऱ्या जातीचा होता. त्यामुळे बहिणीने त्याच्याशी लग्न केलेलं बटेश्वर आणि त्याच्या कुटुंबीयांना रुचलं नाही.

मुंबई : तरुणाने बहिण आणि मेहुण्यावर गोळ्या झाडल्याची घटना मुंबईच्या कांदिवलीतील समतानगर इथे सोमवारी (16 डिसेंबर) घडली. यानंतर तरुणाने स्वत:वरही गोळी झाडत आत्महत्या केली. बटेश्वर त्रिलोकीनाथ तिवारी (वय 32 वर्ष)असं तरुणाचं नाव आहे. बहिणीने आपल्याच परंतु दुसऱ्या जातीच्या मित्रासोबत प्रेमविवाह केल्याचा बटेश्वरच्या मनात होता. त्यामधूनच त्याने हे कृत्य केल्याचं समजतं. या घटनेत बहिण आणि तिचा पती सुखरुप बचावले आहेत. बहिण वंदनाने (वय 20 वर्ष) सहा महिन्यांपूर्वी बटेश्वरचा मित्र रोहित सिंहसोबत (वय 27 वर्ष) प्रेमविवाह केला होता. परंतु रोहित सिंह दुसऱ्या जातीचा होता. त्यामुळे बहिणीने त्याच्याशी लग्न केलेलं बटेश्वर आणि त्याच्या कुटुंबीयांना रुचलं नाही. याचा राग मनात ठेवून बटेश्वर उत्तर प्रदेशातून काल (16 डिसेंबर) त्यांच्या घरी आला. तोंडाला कपडा बांधून तो घरात घुसला आणि त्यांच्याशी भांडण करत बॅगमधून आणलेल्या पिस्तुलातून मेहुणा रोहितवर गोळी झाडली. परंतु वंदनाने प्रसंगावधान दाखवत रोहितला ढकलल्याने त्याचा जीव वाचला. त्यानंतर वंदनाने बटेश्वरला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिच्यावरही गोळी झाडली. गोळी वंदनाच्या गालाला खरचटून गेल्याने ती वाचली. दोघे पती-पत्नी घराबाहेर पळाल्यानंतर बटेश्वरने घराचा दरवाजा बंद करत स्वत:वर गोळी झाडत आयुष्य संपवलं. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे. तसंच या कृत्यासाठी वापरलेल्या शस्त्राचा परवाना बटेश्वरकडे होता की नाही याचा शोध पोलिस घेत आहेत. बटेश्वरच्या शरीरावरील जखमा पाहता गोळी त्याच्या पाठीतून घुसून छातीतून बाहेर आली आहे. याचा अर्थ त्याच्यावर गोळी झाडली आहे, असं पोलिसांच्या सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी मेहुणा रोहितला ताब्यात घेतलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMahayuti vs MVA : निवडणुकीआधी वक्तव्यांचा 'जिहाद'? महायुतीची रणनीती काय? Special ReportZero Hour Shinde Fadnavis on Hindu Votes : हिंदू मतांच्या एकत्रीकरणासाठी शिंदे-फडणवीसांच्या भेटीगाठीZero Hour MVA And Mahayuti : महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासाठी खलबतं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
Embed widget